• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /हॅरी ब्रुकने मोडला शुभमन गिलचा रेकॅार्ड, श्रीलंकेविरुद्ध सामन्यात ठोकले सर्वात जलद द्विशतक

हॅरी ब्रुकने मोडला शुभमन गिलचा रेकॅार्ड, श्रीलंकेविरुद्ध सामन्यात ठोकले सर्वात जलद द्विशतक

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि त्याच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 22, 2026, 06:10 PM IST|Updated: Oct 22, 2026, 06:37 PM IST
joinshare
हॅरी ब्रुकने मोडला शुभमन गिलचा रेकॅार्ड, श्रीलंकेविरुद्ध सामन्यात ठोकले सर्वात जलद द्विशतक

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ट्राय सिरीज खेळवली जात आहे, या मालिकेचा तिसरा एकदिवसीय सामना आज इंग्लंड विरुद्ध श्रीलंका या दोन संघामध्ये खेळवला जात आहे. या दोन संघामध्ये सध्या सामना सुरु आहे, या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक याने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि त्याच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिरंगी मालिकेतील सामन्यात ब्रुकने अवघ्या 114 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले. यासोबतच त्याने शुभमन गिलचा विश्वविक्रम मोडला.

गुरुवारी 22 ऑक्टोबर, 2026 रोजी रावळपिंडी येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला . ब्रुकने 116 चेंडूंमध्ये 202 धावा केल्या, त्याच्या खेळीत 21 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा ब्रुक इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला. त्याच्या झंझटक्या खेळीमुळे इंग्लंडने 50 षटकांत चार गडी गमावून 429 धावांचा डोंगर उभा केला. ग्लेन मॅक्सवेलनंतर, एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारा ब्रुक हा सलामीवीर नसलेला दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी शुभमन गिलच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेंडूंच्या संख्येनुसार सर्वात जलद द्विशतकाचा विक्रम होता. 

WOW!  Harry Brook, that was sensational. https://t.co/F7A5t0g5P5

— England Cricket (@englandcricket) October 22, 2026

हॅरी ब्रुकने 174.13 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत आणि 159 मिनिटे त्यांनी फलंदाजी केली. त्याने केलेले हे द्विशतक क्रिकेटच्या एकदिवसीय इतिहासातील सर्वात जलद द्विशतक ठरले आहे. इंग्लंडने टॉम बँटन आणि बेन डकेट यांच्यासह डावाची सुरुवात केली. बँटनने नऊ चौकारांसह 51 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. तो डुनिथ वेलालागेच्या गोलंदाजीवर बाद झाला. डकेटने 39 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या आणि तोही वेलालागेच्या गोलंदाजीवर बाद झाला. इंग्लंडने 85 धावांत दोन गडी गमावले होते.

हे ही वाचा

किवीला टीम इंडियाने घरच्या मैदानावर केलं पराभूत, भारताचा 4 विकेट्सने विजय

हॅरी ब्रुक व्यतिरिक्त इंग्लंडच्या इतर फलंदाजांनीही उत्कृष्ट कामगिरी केली. विल जॅक्सने अवघ्या 30 चेंडूंमध्ये 66 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीत आठ चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. टॉम बँटनने 51 चेंडूंमध्ये 50 धावा केल्या. ब्रुकच्या ऐतिहासिक खेळीमुळे धावांचा डोंगर उभा केला. विशेष म्हणजे, ब्रुक वगळता इतर कोणताही फलंदाज शतक पूर्ण करू शकला नाही, परंतु कर्णधाराच्या धडाकेबाज खेळीने सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटून टाकले.

Add Zee News as a Preferred Source