स्मृती मंधानाच्या संघाने झिम्बाब्वेला केले क्लीन स्वीप! 8 विकेट्सने टीम इंडियाने मिळवला विजय
भारतीय महिला संघाने स्मृती मंधानाच्या नेतृत्वात झिम्बाब्वेला क्लीन स्वीप केले आहे, तिसऱ्या आणि मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला या सामन्याचा अहवाल सविस्तर वाचा.
भारत महिला विरुद्ध झिम्बाब्वे महिला यांच्यामध्ये आज एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात आला, या सामन्यामध्ये आणि मालिकेमध्ये देखील भारतीय महिला संघाचा दबदबा पाहायला मिळाला. या सामन्यात भारताच्या संघाने 17 ओव्हरमध्ये लक्ष्य पूर्ण केले आणि संघाने 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवून झिम्बाब्वेला व्हाईट वॅाश केले आहे. या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांची तर चांगली कामगिरी पाहायला मिळालीच पण टीम इंडिया यास्तिका भाटीयाचा पहिल्याच चेंडूवर पहिलाच विकेट गमावला आणि टीम इंडियाला मोठा धक्का बसला. या मालिकेमध्ये पहिल्यादा यास्तिका भाटीयाला खेळण्याची संधी मिळाली होती.
वडोदरा येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेचा संघ 131 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने 17 ओव्हरमध्ये केवळ 2 विकेट्स गमावून 132 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. या मालिकेमध्ये भारताच्या संघासाठी दूसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावला त्यानंतर प्रतिका रावल आणि हरलीन देओल यांना संघाची खेळी सांभाळली. हरलीन देओल बाद झाल्यानंतर शेफाली वर्मा मैदानावर आली आणि तिने या मालिकेमध्ये आणखी एक अर्धशतक झळकावले. प्रतिका रावलने मागील सामन्यामध्ये शतक झळकावले होते, तिने तिचा फार्म कायम ठेवला आणि या सामन्यामध्ये देखील अर्धशतक झळकावले.
हे ही वाचा
एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! भारताचा हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर?
प्रतिकाने 56 चेंडूंमध्ये चार चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 59 धावा केल्या, तर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या शफालीने अवघ्या 26 चेंडूंमध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 51 धावा ठोकल्या. भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात झिम्बाब्वेची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. मॉडेस्टर मुपाचिकवाने 48 चेंडूंमध्ये 37 धावा करून झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक धावा केल्या. कर्णधार जोसेफिन न्कोमोनेही 67 चेंडूंमध्ये 35 धावांचे योगदान दिले. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त, झिम्बाब्वेच्या संपूर्ण फलंदाजी फळीला भारतीय गोलंदाजीसमोर धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला.
भारताची सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज वैष्णवी शर्माने पाच बळी घेतले. हा तिचा केवळ तिसरा एकदिवसीय सामना होता आणि तिने ५/३९ अशी सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. याच मैदानावर खेळल्या गेलेल्या मागील एकदिवसीय सामन्यातही तिने चार बळी घेतले होते.