SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

W,W, W, W... T20 पदार्पण सामन्यात 4 चेंडूत 4 विकेट्स घेणारा कोण आहे जमशेद आलम?

जमशेद आलमने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच अशी कामगिरी केली की तो क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला. जमशेद आलमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 22, 2026, 14:40 IST | Updated: Nov 22, 2026, 15:03 IST
Join

एकिकडे भारताच्या संघाचा कसोटी सामना सुरु आहे तर भारत अ संघ आाज पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. त्याव्यतिरिक्त भारतामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कमालीची कामगिरी पाहायला मिळत आहे, आता एक खेळाडूने त्याच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. टी20 क्रिकेटमध्ये हॅट्रीक घेणे हे प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असते, पण जमशेद आलमने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच अशी कामगिरी केली की तो क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला. जमशेद आलमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर वाचा.

23 वर्षीय वेगवान गोलंदाज जमशेद आलमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रविरुद्ध सलग चार चेंडूंवर चार बळी घेऊन इतिहास रचला. टी20 क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. इतकेच नाही, तर त्याने अवघ्या नऊ चेंडूंमध्ये पाच बळी घेऊन आपले पदार्पण संस्मरणीय केले. पुरुष टी20 क्रिकेटमध्ये पदार्पणातच पाच बळी घेणारा तो सहावा भारतीय गोलंदाज आहे. याआधी देखील अशी कामगिरी गोलंदाजांनी केली आहे, यापूर्वी केवळ अभिमन्यू मिथुन आणि दर्शन नळकांडे यांनीच हा पराक्रम केला होता. मिथुनने 2019 च्या उपांत्य सामन्यात हरियाणाविरुद्ध कर्नाटककडून खेळताना हा पराक्रम केला होता. त्याने डावाच्या शेवटच्या षटकात पाच बळी घेतले होते. 

हे ही वाचा

बीसीसीआयने केली इंग्लंडविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा!

2021 च्या उपांत्य सामन्यामध्ये विदर्भाच्या दर्शन नळकांडेने कर्नाटकविरुद्ध सलग चार चेंडूंवर चार बळी घेतले. त्याने 4/28 अशी कामगिरी नोंदवली. मात्र, विदर्भ तो सामना चार धावांनी हरला. जमशेद आलमच्या प्रभावी गोलंदाजीमुळे सौराष्ट्रचा संघ 8 गडी गमावून 153 धावांवर बाद झाला आणि त्यांना 29 धावांनी पराभव पत्करावा लागला. यापूर्वी रेल्वेने 5 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या. जयंत लखनने 47, रवी सिंगने 32 आणि झुबेर अलीने नाबाद 27 धावा केल्या. सौराष्ट्रकडून प्रेरक मानकड आणि मोहित उल्वा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

कोण आहे जमशेद आलाम?

उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला जमशेद आलम हा एक उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये रेल्वेचे प्रतिनिधित्व करतो. त्याने उत्तर प्रदेश टी२० लीगमध्ये मेरठ मॅव्हरिक्सकडूनही खेळला आहे. त्याने रेल्वेसाठी २३ वर्षांखालील गटात सीके नायडू ट्रॉफीमध्येही सहभाग घेतला होता. यावर्षी तो टी20 मुंबई लीगमध्ये आकाश टायगर्स एमडब्ल्यूएसकडूनही खेळला. तो सध्या सय्यद मुश्ताक अली टी20 मध्ये उत्तर प्रदेशकडून खेळत आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES