भारताचा पुरुष संघ एकिकडे न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे तर एकिकडे भारत अ पुरुष संघ आशिया कप खेळत आहे. तर काही दिवसांपूर्वी भारताच्या अंडर 19 संघाने पाकिस्तानला फायनलच्या सामन्यामध्ये पराभूत आशिया कपमध्ये स्थान पक्के केले. आता बीसीसीआयने आणखी एका संघाची घोषणा केली आहे, बीसीसीआयने अंडर 19 महिला संघाची घोषणा केली आहे. भारत अंडर 19 महिला विरुद्ध इंग्लंड अंडर 19 महिला संघामध्ये पाच सामन्यांची टी20 मालिका भारतामध्ये खेळवली जाणार आहे. या मालिकेमध्ये पाचही सामन्याची संपूर्ण वेळापत्रक सविस्तर वाचा आणि कोणत्या खेळाडूंना संघामध्ये स्थान मिळाले यासंदर्भात सविस्तर वाचा.
बीसीसीआयच्या महिला निवड समितीने शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी20 मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. 18 वर्षीय भाविका अहिरे हिची संघाची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. ती यष्टीरक्षणाची जबाबदारीही सांभाळेल. श्रेया एस. चव्हाणचा संघात दुसरी यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. इरा जाधव, निधी महातो, पूर्वा सिवाच, मेहक नरवासे आणि मैत्री मनियार यांसारख्या युवा खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
भाविका अहिरे (कर्णधार आणि विकेटकिपर), इरा जाधव, निधी महतो, पूर्वा सिवाच, मेहक नरवसे, मैत्री मणियार, ईश्वरी अवसरे, दिया यादव, श्रेया एस चव्हाण (विकेटकीपर), समायरा राघव, कुमारी पलक, उमा काश्वी, अचसा परमार, अनादी टागड़े (उपकर्णधार) और पलक सिंह.
News India U19 squad announced for T20 series at home against England U19 Details https://t.co/OwS62ybqW6
— BCCI Women (@BCCIWomen) November 21, 2026
पहिला टी२० - आंतरराष्ट्रीय - २६ नोव्हेंबर - भारत १९ वर्षांखालील विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील - वडोदरा - संध्याकाळी ६ वाजता
दुसरा टी२० - २८ नोव्हेंबर - भारत १९ वर्षांखालील विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील - वडोदरा - दुपारी १ वाजता
तिसरा टी२० - आंतरराष्ट्रीय - १ डिसेंबर - भारत १९ वर्षांखालील विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील - सूरत - संध्याकाळी ६ वाजता
चौथा टी२० - ३ डिसेंबर - भारत १९ वर्षांखालील विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील - सूरत - संध्याकाळी ६ वाजता
पाचवे टी२० - ६ डिसेंबर - भारत १९ वर्षांखालील विरुद्ध इंग्लंड १९ वर्षांखालील - सूरत - दुपारी १ वाजता