माजी क्रिकेटपटूची मुलगी अभिषेक शर्माशी लग्न करणार? मनातील भावना केल्या व्यक्त
माजी क्रिकेट खेळाडू संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर सातत्याने चर्चेत पाहायला मिळाली आहे. झालेल्या मुलाखतींमध्ये एका रॅपिड-फायर राऊंडदरम्यान अनायाला भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
भारतीय क्रिकेट खेळाडूंची चर्चा भारतातच नाही तर जगभरामध्ये पाहायला मिळते, जगभरात त्याच्या खेळीची तर चर्चा होतेच त्याचबरोबर त्यांच्या सौदर्यांची देखील मुलींमध्ये चर्चा पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून माजी क्रिकेट खेळाडू संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर सातत्याने चर्चेत पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिला ऑस्ट्रेलिया क्रिकेटने तिला खेळण्याची परवानगी दिली होती. आता तिने एक नुकतीच मुलाखत दिली आहे, यामध्ये तिने मोठे विधान केले आहे. झालेल्या मुलाखतींमध्ये एका रॅपिड-फायर राऊंडदरम्यान अनायाला भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
रॅपिड-फायर राऊंडमध्ये अनाया बांगरला किल, मैरी और हुक अप कोणासोबत करणार यासंदर्भात विचारण्यात आले यामध्ये तिला तीन खेळाडूंची नावे देखील देण्यात आली होती. रॅपिड-फायर राऊंड यामध्ये अनाया बांगरला किल, मैरी और हुक अपमध्ये अभिषेक शर्मा, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल हे तीन पर्याय देण्यात आले होते. या निवडीमुळे अनन्या थोडी गोंधळलेली होती, पण ती हुशारीने निवड करते. ती श्रेयस अय्यरला किल करायचे, अभिषेक शर्माशी लग्न करायचे आणि शुभमन गिलसोबत जवळीक साधायची अशी निवड अनाया बांगर करते. यूट्यूबवर अनन्या बांगरचे हे संभाषण चॅनलवर शेअर केले गेले असून ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
हे ही वाचा
झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत टीम इंडियाचा एकतर्फी विजय! भारताने 9 विकेट्सने केले पराभूत
भारताचा माजी खेळाडू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर हिने लिंगबदल केले आहे, तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली आहे. अनाया होण्यापूर्वी तिचे नाव आर्यन होते, अनाया होण्यापूर्वी ती मुंबई क्रिकेटमध्ये पुरुषांच्या वयोगटामध्ये देखील क्रिकेट खेळली आहे. भारतीय संघाचे काही खेळाडू तिचे मित्रपरिवार देखील आहेत, 2022 मध्ये तिने आपले लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. लिंग बदलल्यानंतर आता ती पुन्हा तिच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात करणार आहे