भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघाचा मालिकेचा दुसरा सामना पार पडला. पहिल्या सामन्यामध्ये झिम्बाब्वेच्या संघाने पहिले चार विकेट्स गमावले होते पण त्यानंतर दिप्ती शर्मा आणि निकी प्रसादने संघाची खेळी सांभाळली आणि पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता. भारत विरुद्ध झिम्बाब्वे आज पार पडलेला दुसऱ्या सामन्यामध्ये टीम इंडियाने सामना एकतर्फी जिंकला. या सामन्यामध्ये भारतीय संघाची गोलंदाजी त्याचबरोबर फलंदाजी देखील प्रभावी पाहायला मिळाली. भारताच्या संघाने मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये झिम्बाब्वेला 9 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिका जिंकली आहे.
मालिकेच्या दुसऱ्या सामन्याबद्दल सांगायचे झाले तर झिम्बाब्वेच्या संघाने आजच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये झिम्बाब्वेच्या संघाने पहिले फलंदाजी करत 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 102 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतीय महिला क्रिकेट संघाने 8.5 षटकांत 9 गडी राखून सामना जिंकला. यासह, स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधार म्हणून आपली पहिली टी20 मालिका जिंकली आहे. भारताच्या दोन्ही सलामीवीर फलंदाज शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी भारताला दमदार सुरुवात करुन दिली.
Skipper Smriti Mandhana finishes it off in style #TeamIndia with a clinical -wicket win to clinch the series 2-0 🇮🇳 Scorecard https://t.co/kECmCQJzty #INDvZIM | @mflone_ https://t.co/O7MAN9o4J3
— BCCI Women (@BCCIWomen) October 18, 2026
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर मैदानावर पाऊल ठेवल्याच्या क्षणापासून शफाली वर्माने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. केवळ 25 चेंडूंचा सामना करताना, तिने सहा चौकार आणि चार उत्तुंग षटकार ठोकत धडाकेबाज 55 धावा केल्या. तिचा स्ट्राईक रेट 220.00 होता, ज्यामुळे सुरुवातीच्या षटकांमध्येच सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकले. दुसरीकडे, कर्णधार स्मृती मंधानाने आपल्या संघाला पूर्ण पाठिंबा दिला आणि आपल्या उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. मंधानाने 25 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद ४७ धावा केल्या. तिचा स्ट्राईक रेट 188.00 होता. डावाच्या अखेरीस अनुष्का शर्मा 1 धावेवर नाबाद राहिली.
हे ही वाचा
भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर मागील सामन्यामध्ये पदार्पण करणारी निकी प्रसादने संघासाठी 2 विकेट्स घेतले तिने मागील सामन्यामध्ये फलंदाजी देखील प्रभावी केली होती. दिप्ती शर्मा, दिप्ती शर्मा, नंदनी शर्मा आणि श्री चरणी यांनी संघासाठी आजच्या सामन्यामध्ये प्रत्येकी एक विकेट घेतला.