6,6,6,6,6,6,6,6,6,6,6,6... प्रियांश आर्याच्या बॅटमधून षटकारांचा पाऊस! 36 चेंडूत ठोकलं शतक
दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यातील हा सामना इंदूरमधील डेली कॉलेज ग्रुप मैदानावर खेळला जात आहे. तामिळनाडूने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यातील प्रियांश आर्याच्या कामगिरीबद्दल सविस्तर वाचा.
भारत अ संघ सध्या यूएईविरुद्ध सामना खेळत आहे तर भारतामध्ये देखील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा खेळवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रन्चायझींनी रिटेन लिस्ट जाहीर केली होती, यामध्ये पंजाब किंग्जच्या संघाने प्रियांश आर्याला संघाने रिटेन केले आहे. हा पंजाब किंग्जचा निर्णय यशस्वी होणार असे पाहायला मिळत आहे, त्याचे कारण म्हणजेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रियांश आर्याने धूमाकुळ घातला आहे. दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यातील हा सामना इंदूरमधील डेली कॉलेज ग्रुप मैदानावर खेळला जात आहे. तामिळनाडूने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यातील प्रियांश आर्याच्या कामगिरीबद्दल सविस्तर वाचा.
दिल्ली विरुद्ध तामिळनाडू यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये दिल्लीचा कर्णधार प्रियांश आर्या दमदार लयीमध्ये पाहायला मिळाला. मैदानावर आल्यापासून प्रियांशने संघासाठी मोठे फटकेबाजी करायला सुरुवात केली, सुरुवातीला पहिला धक्का बसला. यश धुल अवघ्या 8 धावांवर बाद झाला आणि पहिला विकेट गेल्यानंतर नितीश राणाही 18 धावांवर बाद झाला. संघाचे दोन विकेट्स गेले पण प्रियांशने धावगती कमी केली नाही आणि त्याने एका बाजूने फटकेबाजी सुरुच ठेवली. तामिळनाडूविरुद्ध सामन्यामध्ये प्रियांशने अवघ्या 18 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावले.
हे ही वाचा
मॅचविनर ठरला विलन? तिलक वर्मा सोशल मिडियावर ट्रोल! पाकिस्तानविरुद्ध पराभवाचं कारण...
अर्धशतक झळकावल्यानंतर त्याचा तडाखा त्याने सुरुच ठेवला आणि 36 चेंडूमध्ये त्याने शतक पूर्ण केले. यामध्ये त्याने 4 चौकार आणि 12 षटकार मारले, त्याच्या शतकातील 80 धावा केवळ चौकारांनीच आल्या. प्रियांशच्या कर्णधारपदाच्या खेळीमुळे दिल्लीला मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत झाली. प्रियांश आर्याने आता एका टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत फिन ॲलनची बरोबरी केली आहे. न्यूझीलंडच्या फिन ॲलनने वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्धच्या सामन्यात सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून खेळताना 19 षटकार मारले होते.
प्रियांश आर्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जच्या संघाकडून खेळतो, आतापर्यत त्याने आयपीएलमध्ये त्याच्या कामगिरी सातत्याने चर्चेत राहिला आहे. पंजाब किंग्जची जोडी प्रभसिमरण सिंग आणि प्रियांश आर्या या जोडीने आयपीएलमध्ये मागील सिझनमध्ये धूमाकुळ घातला होता. प्रियांशने 30 आयपीएल सामन्यांमध्ये 27.96 च्या सरासरीने 839 धावा केल्या असून, त्यात एका शतकाचा आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.