SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हार्दिक पांड्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अजून एका दिग्गजाची पंजाब किंग्समध्ये एंट्री

IPL 2027 : हार्दिक पांड्यानंतर मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफमधील अजून एका महत्वाच्या व्यक्तीने पंजाब किंग्स फ्रेंचायझी जॉईन केली आहे. त्यामुळे आता पंजाब किंग्सचा सपोर्ट स्टाफ सुद्धा आणखीन मजबूत झाला आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Nov 24, 2026, 14:53 IST | Updated: Nov 24, 2026, 15:39 IST
Image Credit: हार्दिक पांड्यानंतर मुंबई इंडियन्सच्या अजून एका दिग्गजाची पंजाब किंग्समध्ये एंट्री
Join

IPL 2027 : हार्दिक पांड्याच्यानंतर आता मुंबई इंडियन्समधील अजून एकाची पंजाब किंग्समध्ये एंट्री झाली आहे. आयपीएल 2027 सीजनच्या आधी पंजाब किंग्सने पारस म्हाम्ब्रे याला बॉलिंग कोच म्हणून नियुक्त केलं आहे. याशिवाय राजीव कुमारला सुद्धा फिल्डिंग कोच म्हणून निवडलं आहे. हे दोघेही पंजाब किंग्समध्ये ऑस्ट्रेलियाच्या जेम्स होप्स आणि ब्रॅड हॅडीनची जागा घेतील. या दोघांनी मागच्या महिन्यात गोलंदाजी आणि फिल्डिंग कोच पदावरून राजीनामा दिला.

पारस म्हाम्ब्रे याला मागच्या महिन्यात मुंबई इंडियन्सने आपल्या कोचिंग स्टाफमधून बाहेर केलं होतं. हे दुसऱ्यांदा असेल जेव्हा 54 वर्षांचे पारस म्हाम्ब्रे हे पंजाब किंग्सचा मुख्य कोच रिकी पॉन्टिंग सोबत मिळून काम करेल. याआधी 2015 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कोचिंग स्टाफचा भाग म्हणून त्यांनी पॉंटिंगसोबत काम केले होते. पारस म्हाम्ब्रे यांच्याकडे कोचिंगचा मोठा अनुभव असून राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असताना 2021 ते 2024 या काळात त्याने भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले होते.

राजीव कुमारला फिल्डिंग कोच म्हणून नियुक्त केलं :

राजीव कुमार यापूर्वी चेन्नई सुपरकिंग्सचा सहाय्यक कोच होते. पंजाब किंग्सला सुद्धा आयपीएलमध्ये त्यांच्या पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. पंजाब किंग्स 2014 आणि 2025 मध्ये उपविजेता ठरला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्सचा संघ मागील वर्षी पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी राहिला.

हेही वाचा : निवृत्तीनंतरही धोनीच CSK चा बॉस? टीममध्ये कोण IN, कोण OUT... तोच ठरवणार?

मुंबई इंडियन्समधून ट्रेड झाला हार्दिक पांड्या :

पारस आणि राजीव यांच्या आधी ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सकडून पंजाब किंग्सकडे ट्रेड करण्यात आले होते. हार्दिकने गेल्या तीन सीजनमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले होते, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. परिणामी मुंबईने त्याला पंजाब किंग्सच्या अर्शदीप सिंगच्या बदल्यात ट्रेड करण्याचा निर्णय घेतला. मुंबई आणि पंजाब किंग्स यांच्यात ही डील 18 कोटींची झाली असून हार्दिकच्या येण्याने पंजाब किंग्सची कोचिंग टीम खूप मजबूत दिसत आहे. मुंबईच्या संघात जसप्रीत बुमराहचा जोडीदार म्हणून अर्शदीपच्या समावेशामुळे संघ आता चांगला संतुलित झाला आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES