SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार? IPL 2027 मध्ये करणार नेतृत्व, हार्दिक पांड्याची हकालपट्टी?

Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे. तर संघाचा सध्याचा कर्णधार हार्दिक पांडयाची संघातून हकालपट्टी होणार याबाबत सुद्धा जोरदार चर्चा आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 14, 2026, 06:47 AM IST | Updated: Oct 14, 2026, 07:39 AM IST
Join

Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2027 सुरु होण्यासाठी आता काहीच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. डिसेंबर महिन्यात या आगामी सीजनसाठी मिनी ऑक्शन पार पडणार असून नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत सर्व संघांना आपल्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. स्टार क्रिकेटर रोहित शर्माने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला तब्बल 5 आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या. मात्र आयपीएल 2024 मध्ये त्याला कर्णधारवपदावरून बाजूला करून हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलेलं होतं. मात्र हार्दिकच्या नेतृत्वात संघाचा परफॉर्मन्स ढासळला. त्यामुळे आयपीएल 2027 साठी रोहित शर्माकडे पुन्हा नेतृत्व सोपवलं जाणार अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येतेय.

रोहित होणार कर्णधार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार आता पुन्हा एकदा रोहित शर्मा आगामी सीजनसाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार होऊ शकतो. रोहित शर्मा हा सध्या 39 वर्षांचा असून पुढील आयपीएलपर्यंत तो 40 वर्षांचा होईल. रोहित शर्मा पुन्हा एकदा जर आयपीएल सीजनमध्ये कर्णधार बनला तर तो कितीकाळ संघाचं नेतृत्व सांभाळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र रोहित शर्मा हा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार याविषयी कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. तेव्हा आता आगामी सीजनपूर्वी रोहितकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं तर हार्दिक पांड्याचं काय होणार याविषयी सुद्धा फ्रेंचायझीमध्ये जोरदार चर्चा आहे.

रोहित आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार :

रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याने आपल्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला तब्बल 5 वेळा आयपीएलचं विजेतेपद जिंकून दिलं. तर त्यापाठोपाठ एम एस धोनीने सुद्धा चेन्नई सुपरकिंग्सचं नेतृत्व करत असताना तब्बल 5 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. आयपीएल 2013, आयपीएल 2015, आयपीएल 2017, आयपीएल 2019, आयपीएल 2020 अशी पाच वर्ष मुंबई संघाने आयपीएलचं विजेतेपद पटकावलं.

रोहित शर्माचं करिअर :

रोहित शर्माच्या आयपीएल करिअरबद्दल बोलायचं झालं तर आयपीएल करिअरमध्ये त्याने आतापर्यंत 281 सामने खेळले आहेत. यातील 276 इनिंगमध्ये त्याने 7329 धावा केल्या असून या दरम्यान 2 शतक आणि 49 अर्धशतक त्याने ठोकलं आहे. ज्यात त्याचा सर्वोत्कृष्ट स्कोअर 109 असा होता. त्यांनी गोलंदाजी केलेल्या उर्वरित 32 इनिंगमध्ये हिटमॅनने 15 विकेट्स सुद्धा घेतले, ज्यामध्ये 4/6 ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES