शुभमन गिल OUT की NOT Out? कर्णधाराचा विकेट वादात, न्यूझीलंडचे खेळाडू पंचाशी भिडले
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याचे 2 धावांनी शतक हुकले, पण त्याआधी गिलचा विकेट सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय आहे. नक्की सामन्यादरम्यान झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा आणि व्हिडिओ देखील पहा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस पार पडला, या सामन्यामध्ये भारतीय संघाची मजबूत फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला, यामध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने शतक झळकावले. तर भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल याचे 2 धावांनी शतक हुकले, पण त्याआधी गिलचा विकेट सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय आहे. नक्की सामन्यादरम्यान झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा आणि व्हिडिओ देखील पहा.
शुभमन गिल बाद झाल्याची अपील न्यूझीलंडच्या खेळाडूंनी केली आणि ही घटना 108 व्या ओव्हरमधील आहे. नॅथन स्मिथचा आत येणारा चेंडू थेट शुभमन गिलच्या पॅडवर लागला. मैदानातील पंचांनी बोट वर करून गिलला बाद घोषित केले, पण गिलने लगेच रिव्ह्यू घेतला नाही. त्याने आधी दुसऱ्या टोकाला असलेल्या ऋषभ पंतचा सल्ला घेतला. रिव्ह्यूचे शेवटचे फक्त तीन सेकंद शिल्लक असताना, पंतने आपल्या कर्णधाराला डीआरएस घेण्याचा आग्रह केला. पंतच्या निर्णयामुळे गिल बाद होण्यापासून वाचला आणि तिथून पुढे भारतीय संघाने वेगाने धावा करणे सुरू ठेवले.
हे ही वाचा
IND vs NEP : प्रिन्स यादव आणि हर्षित राणा नेपाळला 26 धावांवर गुंडाळलं! भारताचा 306 धावांनी विजय
तिसऱ्या पंचांनी शुभमन गिलला नाबाद घोषित केल्यानंतर न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी पंचांशी वाद देखील घालला पण त्यानंतर पंचाचा निर्णय हा शेवटचा निर्णय घोषित करण्यात आला. तिसऱ्या पंचांनी विविध कोनांमधून रिप्लेचे पुनरावलोकन केले. अल्ट्राएजमध्ये एक लहानसा स्पाइक दिसला, ज्यावरून असे सूचित झाले की चेंडू बॅटच्या आतल्या कडेला लागून पॅडला लागला होता. तिसऱ्या पंचांनी मैदानातील पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांना कळवले की चेंडू बॅटला लागला होता, त्यानंतर मैदानातील पंचांचा निर्णय बदलण्यात आला आणि गिल क्रीजवर कायम राहिला.
न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी सामन्यामधील भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर यशस्वी जयस्वालने संघाला कमालीची सुरुवात करुन दिली. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये 85 धावांची खेळी खेळली, तर केएल राहुलने संघासाठी शतक झळकावले. केएल राहुल या सामन्यामध्ये 136 धावा केल्या, देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता त्याने संघासाठी 80 धावांची खेळी खेळली. भारताचा कर्णधार शुभमन गिल 98 धावांवर बाद झाल आणि त्याचे शतक हुकले, तर रिषभ पंत आणि अंशुल कंबोज सध्या क्रिजवर आहेत.