SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कर्णधार झाल्यावर स्मृती मंधानाचं पहिलं वक्तव्य, जिंकलं प्रत्येक भारतीयांचं मन

IND VS ZIM : भारत विरुद्ध झिम्बाब्वे सीरिजपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्मृती मंधाना पहिल्यांदाच टीम इंडियाची पूर्णवेळ कर्णधार म्हणून पत्रकार परिषदेला संबोधित करत होती. यावेळी तिने आपल्या फलंदाजीबाबत आणि कर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत भाष्य केलं.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 15, 2026, 02:00 PM IST | Updated: Oct 15, 2026, 02:39 PM IST
Image Credit: कर्णधार झाल्यावर स्मृती मंधानाच पहिलं वक्तव्य, जिंकलं प्रत्येक भारतीयांचं मन
Join

IND VS ZIM : भारताला आपल्या नेतृत्वात पहिला महिला वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणारी कर्णधार हरमनप्रीत कौर हिने एशियन गेम्स 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकल्यावर काहीच दिवसात ती कर्णधारपदावरून पायउतार झाली. त्यानंतर उपकर्णधार असलेल्या स्मृती मंधाना हिला टीम इंडियाची नवीन कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. स्मृती मंधानाने भारत विरुद्ध झिम्बाब्वे सीरिजपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की  तिला कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्याची माहिती त्याच दिवशी मिळाली, ज्या दिवशी अधिकृत निवेदन जारी करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या घोषणेच्या आदल्या दिवशी एक आढावा बैठक झाली होती, ज्यामध्ये हरमनप्रीत कौर, मानधना, मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार आणि बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्मृती मंधाना ही टीम इंडियाची फुल टाइम कर्णधार झाल्यावर भारतीय महिला संघाची ही पहिलीच सीरिज आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 सीरीज खेळवली जाणार असून 16 ऑक्टोबर याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी एक पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत तिने सांगितलं की कर्णधारपदाच्या दबावामुळे तिच्या बॅटिंग स्टाईलमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत.

काय म्हणाली स्मृती मंधाना?

 

भारताची ओपनर फलंदाज स्मृती मंधाना तिच्या आक्रमक खेळण्याच्या शैलीसाठी ओळखली जाते. कर्णधारपदाच्या दबावामुळे तिच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनात काही बदल होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने उत्तर दिले, 'मैदानावर मी कर्णधाराची जबाबदारी स्वीकारली आहे, पण माझ्या फलंदाजीच्या स्टाईलमध्ये कोणताही बदल होणार नाही'. सलामीवीर फलंदाज स्मृती मानधना तिच्या आक्रमक खेळण्याच्या शैलीसाठी ओळखली जाते. कर्णधारपदाच्या दबावामुळे तिच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनात काही बदल होईल का? यावर तिने उत्तर दिले, 'मैदानावर मी कर्णधाराची जबाबदारी स्वीकारली आहे, पण माझ्या फलंदाजीच्या शैलीत कोणताही बदल होणार नाही'.

स्मृती म्हणाली की, 'मी यापूर्वी सुद्धा लीडरशिप ग्रुपचा भाग होती. त्याला संघाचं कर्णधार किंवा नेतृत्व मिळणं हे माझ्यासाठी नवीन नाही'. तसेच स्मृतीने टी20 च्या संदर्भात म्हणाली की, 'त्या चांगली कामगिरी करत आहेत, परंतु तिला 10 टक्के सुधारणा हवी आहे आणि मुलींनाही याची जाणीव आहे'.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES