कॅप्टन स्मृती मानधनाचा संघ एकतर्फी मालिका जिंकणार? वाचा शेवटच्या सामन्याची संपूर्ण माहिती
भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघामध्ये मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना शिल्लक आहे पण टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यामध्ये एकतर्फी सामना जिंकून मालिकेमध्ये विजय मिळवला आहे.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघामध्ये मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे, टीम इंडियाने स्मृती मानधनाच्या नेतृत्वात भारतीय संघाची मालिकांमध्ये विजयी सुरुवात केली आहे. भारताच्या संघासमोर पहिल्या सामन्यामध्ये झिम्बाब्वेच्या संघाने मोठे आव्हान उभे केले होते त्यावेळी दिप्ती शर्मा आणि निकी प्रसाद या दोन्ही खेळाडूंनी भारतीय संघाची खेळी सांभाळली आणि भारताच्या संघाला विजय मिळवून दिला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये भारतीय संघाची कामगिरी प्रभावी पाहायला मिळाली आणि टीम इंडियाने दुसऱ्या मालिकेच्या सामन्यामध्ये एकतर्फी सामना 9 विकेट्सने जिंकला.
दुसऱ्या सामन्याचा अहवाल
103 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला क्रिकेट संघाने शानदार सुरुवात केली. सलामीवीर शफाली वर्माने अवघ्या 25 चेंडूंमध्ये 55 धावा ठोकल्या. 220 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना शफालीने सहा चौकार आणि चार उत्तुंग षटकार ठोकले. कर्णधार स्मृती मंधानाने 25 चेंडूंमध्ये नाबाद 47 धावा करून तिला चांगली साथ दिली. 188 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना मंधानाने सहा चौकार आणि दोन उत्तुंग षटकार ठोकले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अनुष्का शर्माने नाबाद 1 धाव काढली. तिच्या या खेळीमुळे टीम इंडियाने अवघ्या 8.5 षटकांत 1 गडी गमावून 104 धावा केल्या. यासह टीम इंडियाने 11षटके आधीच 9 गडी राखून सामना जिंकला. या विजयासह भारतीय महिला क्रिकेट संघाने मालिका 2-0 ने जिंकली आहे. झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाकडून बिलाउड बिझाने 1 बळी घेतला.
हे ही वाचा
रमेश पवार मुख्य निवडकर्ता का झाले नाहीत? बीसीसीआयने स्वत: केले स्पष्ट
कधी आणि कुठे पाहता येणार सामना?
भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघाचा तिसरा आणि मालिकेचा शेवटचा सामना हा 20 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. या मालिकेचा तिसरा आणि शेवटच्या सामन्याचे आयोजन हे रायपूरच्या मैदानावर होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहॅाटस्टारवर क्रिकेट चाहत्यांना भारतामध्ये पाहायला मिळणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याला सुरुवात 7.00 वाजता सुरु होणार आहे तर या सामन्याचे नाणेफेक 6.30 वाजता होणार आहे.
भारतीय महिला टीम
स्मृति मंधाना (कर्णधार), शैफाली वर्मा, अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, दीप्ति शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अरुंधति रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा, क्रांति गौड़, गुनालन कमलिनी, प्रेमा रावत, जिन्तिमणि कलिता, मिन्नू मणि