• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /रमेश पवार मुख्य निवडकर्ता का झाले नाहीत? बीसीसीआयने स्वत: केले स्पष्ट

रमेश पवार मुख्य निवडकर्ता का झाले नाहीत? बीसीसीआयने स्वत: केले स्पष्ट

मागील काही दिवसांपासून भारतीय पुरुष संघाचे पुढील मुख्य निवडकर्ते कोण असणार यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. बीसीसीआयने आता रमेश पवार यांची निवड समितीमध्ये नियुक्ती केली आहे, पण त्यांना मुख्य निवडककर्ताचे पद का देण्यात आले नाही?

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 19, 2026, 07:38 PM IST|Updated: Oct 19, 2026, 08:16 PM IST
joinshare
रमेश पवार मुख्य निवडकर्ता का झाले नाहीत? बीसीसीआयने स्वत: केले स्पष्ट

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारताच्या पुरुष संघाचे निवडकर्ते अजित आगारकर यांचा कार्यकाळ संपला, त्यानंतर मागील काही दिवसांपासून भारतीय पुरुष संघाचे पुढील मुख्य निवडकर्ते कोण असणार यासंदर्भात चर्चा सुरु होत्या. आता बीसीसीआयने भारतीय पुरुष संघाच्या मुख्य निवडकर्त्यांची घोषणा केली आणि सोशल मिडियावर अनेक माजी खेळाडूंची नावे समोर आली होती. बीसीसीआयने आता रमेश पवार यांची निवड समितीमध्ये नियुक्ती केली आहे. सर्वाधिक कसोटी सामने खेळलेले प्रज्ञान ओझा हे समितीच्या अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारतील. रमेश पवार हे अजित आगरकर यांच्या जागी पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतील. आता रमेश पवार यांना का मुख्य प्रशिक्षकपद नाही दिले यासंदर्भात सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत.

मागील काही वर्षांमध्ये भारताच्या संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर कमालीची कामगिरी केली आहे. माजी भारतीय खेळाडू प्रज्ञान ओझा सप्टेंबर 2025 मध्ये टीम इंडियाचे निवडकर्ता बनले. त्यावेळी आरपी सिंग हे देखील निवडकर्ता होते. त्यावेळी अजित आगरकर मुख्य निवडकर्ता होते. आगरकर जुलै 2023 मध्ये टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता बनले. ते तीन वर्षांहून अधिक काळ टीम इंडियाच्या निवडीमध्ये सहभागी होते. त्यांनी तीन आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांची जागा घेणे सोपे नव्हते. आता प्रज्ञान ओझा यांना निवडकर्ता का करण्यात आले यासंदर्भात वाचा.

हे ही वाचा

बीसीसीआयच्या मुख्य निवडर्त्यांची घोषणा, 'या' माजी खेळाडूने घेतली अजित आगरकर यांची जागा

भारतीय क्रिकेट संघाच्या निवडीशी संबंधित जबाबदाऱ्यांच्या फेरबदलात, बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) रमेश पवार यांची शिफारस केली. अशोक मल्होत्रा ​​आणि जतीन परांजपे यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीने बीसीसीआयच्या मुख्यालयात अर्जदारांची छाननी आणि मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर पुरुष निवड समितीचे सदस्य म्हणून पवार यांची एकमताने शिफारस करण्यात आली. रमेश पवार यांच्या नियुक्तीनंतर, बीसीसीआयने प्रज्ञान ओझा हे टीम इंडियाचे पुढील मुख्य निवडकर्ता असतील अशी घोषणा केली. निवड समितीवरील सर्व माजी खेळाडूंमध्ये ओझाने सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत, आणि आता याचा त्याला फायदा झाला आहे. सध्याच्या निवड समितीत प्रज्ञान ओझा, रमेश पवार, आरपी सिंग आणि अजय रात्रा यांचा समावेश आहे. या पाच सदस्यांवर आता 2027च्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्याची जबाबदारी असेल.

प्रज्ञान ओझाचा रेकॉर्ड कसा आहे?

प्रज्ञान ओझाने टीम इंडियासाठी एकूण 24 कसोटी सामने खेळले आहेत. या काळात त्याने 30.26 च्या सरासरीने 113 बळी घेतले. या काळात ओझाने सात वेळा 5 बळी आणि एकदा 10 बळी घेतले आहेत. त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी 18 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ओझाने 31.04 च्या सरासरीने 21 बळी घेतले आहेत. प्रज्ञानचा इकॉनॉमी रेट 4.46 राहिला आहे. ओझाने 6 टी-20 सामनेही खेळले आहेत. प्रज्ञानने 13.20 च्या सरासरीने 10 बळी घेतले असून त्याचा इकॉनॉमी रेट 6.28 राहिला आहे.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cricket News
Sports News