भारताला आशियाई खेळांमध्ये ऐतिहासिक सुवर्ण मेडल मिळवून देणारी कोण आहे नीरू धांडा?
भारताच्या दहाव्या आशियाई खेळाची सुरुवात ही सुवर्ण झाली आहे, या स्पर्धेमध्ये चालू आशियाई क्रिडा स्पर्धेत भारताचे हे पाचवे सुवर्ण पदक आहे. भारताला ऐतिहासिक सुवर्ण पदक मिळवून देणारी कोण आहे नीरू धांडा?
आशियाई खेळ 2026 जपानमध्ये सुरु आहेत, या दहाव्या आशियाई खेळाची सुरुवात भारताची सुवर्ण झाली आहे. मागील काही दिवसांपासून ब्रान्झ आणि सिल्वर मेडल भारताचे जिंकले आहेत पण गोल्ड मेडलची संख्या कमी झाली आहे. आज भारताची आशियाई खेळ 2026 च्या दहाव्या दिनाची सुरुवात गोल्ड मेडलने झाली आहे. नीरू धांडा हिच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर महिलांच्या ट्रॅप एकेरी प्रकारात गोल्ड मेडल नावावर केले आहे. फायनलच्या फेरीमध्ये भारताची धीरू नांडा हिने 28 गुण मिळवून एक नवीन आशियाई रेकॅार्ड नावावर नोंदवला आहे. चालू आशियाई क्रिडा स्पर्धेमध्ये भारताचे हे पाचवे सुवर्ण पदक आहे. तिने मागील काही महिन्यांमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे.
नीरू धांडा आता आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. तिने एक महत्त्वपूर्ण विक्रम रचला आहे. नीरूने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे, जी इतिहासाच्या पानांवर कोरली गेली आहे. तथापि, हा टप्पा गाठण्यासाठी तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. भारताचे वैयक्तिक प्रकाराचे हे पहिले सुवर्ण पदक आहे, यापूर्वी भारताच्या खात्यामध्ये मिळालेले सर्व सुवर्ण मेडल हे सांघिक प्रकारामध्ये मिळवले आहेत. चालू आशियाई क्रिडा स्पर्धेमध्ये आता भारताच्या नावावर 47 (5 सुवर्ण, 21 रौप्य आणि 21 कांस्य) पदके झाली आहेत. भारत आता जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर आहे.
रणधीर सिंग होती, जिने 1978 मध्ये पुरुषांच्या ट्रॅप वैयक्तिक स्पर्धेत भारतासाठी ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते, तर रोंजन सोधीने 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डबल ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. नीरूने 118 गुणांसह कतारच्या रे बेसिलसोबत संयुक्तपणे पहिले स्थान पटकावत आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. तिच्या 118 गुणांनी पात्रता फेरीतही क्रीडा स्पर्धेचा विक्रम प्रस्थापित केला.
कोण आहे नीरू धांडा?
नीरू धांडा यांचा जन्म 25 मे 2000 रोजी हरियाणातील जिंद येथे झाला. त्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी आहेत. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होते आणि त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी पैसे नव्हते. त्यांचा मोठा भाऊ, लक्ष्य, आणि त्यांच्या चुलत भावाने त्यांना लक्षणीय प्रगती करण्यास मदत केली. आर्थिक अडचणी असूनही, त्या खंबीर राहिल्या आणि त्यांनी कठोर प्रशिक्षण घेतले.