IND vs ZIM सामन्यात का बांढली होती खेळाडूंनी हाताला काळी पट्टी? वाचा कारण
IND vs ZIM या सामन्यामध्ये या सामन्यात भारतीय संघ स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली प्रथमच मैदानात उतरत आहे. या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली होती.
भारत महिला संघ विरुद्ध झिम्बाब्वे महिला संघ यांच्यामध्ये मालिकेचा पहिला सामना रायपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाने नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. स्मृती मानधनाच्या हाती कर्णधारपद सोपवल्यानंतर आता टीम इंडियाने या नव्या पर्वाला आजपासून सुरुवात केली आहे. भारतीय आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघांचा हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यामध्ये या सामन्यात भारतीय संघ स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली प्रथमच मैदानात उतरत आहे. या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडूंनी हातावर काळी पट्टी बांधली होती.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये सामना सुरु होण्याआधी सर्व खेळाडूंनी आणि सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी एक मिनिट मौन पाळले. आता अनेकांना प्रश्न आहे की सामना सुरु होण्यापूर्वी खेळाडूंनी मौन का पाळले आणि हाताला काळी पट्टी का बांधली होती? रायपूर येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारत आणि झिम्बाब्वेचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून खेळत आहेत. 12 ऑक्टोबर रोजी निधन झालेल्या झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटपटू आणि पंच सारा डंबनेवाना यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांनी हे पाऊल उचलले आहे. डंबनेवाना यांनी झिम्बाब्वेसाठी वेगवान गोलंदाज म्हणून क्रिकेट खेळले आणि नंतर पंच म्हणून कारकीर्द घडवली.
हे ही वाचा
6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4... वीरेंद्र सेहवागच्या मुलाने घातला मैदानावर धुमाकूळ! खेळली 173 धावांची धडाकेबाज खेळी
दीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर वयाच्या 36 व्या वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले. सामना सुरू होण्यापूर्वी, सर्व खेळाडूंनी त्यांच्या सन्मानार्थ एक मिनिट मौन पाळले. बीसीसीआयने ही माहिती सोशल मीडियावर दिली. झिम्बाब्वेच्या माजी क्रिकेटपटू आणि अंपायर सारा डाम्बानेवाना यांच्या अलीकडील निधनानिमित्त, भारतीय क्रिकेट संघ, झिम्बाब्वे क्रिकेट संघ आणि सामना अधिकारी यांनी त्यांच्या सन्मानार्थ आणि स्मृतीप्रित्यर्थ हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आहेत आणि एक मिनिटाचे मौन पाळले आहे.
या सामन्याच्या पहिल्या डावाबद्दल सांगायचे झाले तर झिम्बाब्वेच्या संघाने पहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 114 धावा केल्या. भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर नंदनी शर्माने संघासाठी 2 विकेट्स संघासाठी घेतले. क्रांती गौड त्याचबरोबर अरुंधती रेड्डी आणि श्री चरणी यांनी संघासाठी प्रत्येकी एक विकेट घेतला.
भारत महिला: शफाली वर्मा, स्मृती मानधना (कर्णधार), अनुष्का शर्मा, हरमनप्रीत कौर, निकी प्रसाद, रिचा घोष (विकेटकिपर), दिप्ती शर्मा, श्री चर्नी, अरुंधती रेड्डी, नंदिनी शर्मा आणि क्रांती गौड.
झिम्बाब्वे महिला: केलीस एनधलोवू, प्रिय बिझा, चिपो मुगेरी-तिरिपानो, शारने मेयर्स, मिशेल मावुंगा, न्याशा ग्वांझुरा, फ्रान्सिस्का चिपारे, मॉडेस्टर मुपाचिक्वा (विकेटकीपर), जोसेफिन एनकोमो (कर्णधार), ओलेंडर चारे आणि तेंडाई माकुशा.