• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4... वीरेंद्र सेहवागच्या मुलाने घातला मैदानावर धुमाकूळ! खेळली 173 धावांची धडाकेबाज खेळी

6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4... वीरेंद्र सेहवागच्या मुलाने घातला मैदानावर धुमाकूळ! खेळली 173 धावांची धडाकेबाज खेळी

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग मागील काही दिवसांपासून त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत पाहायला मिळत आहे. त्याने आणखी एकदा त्याच्या खेळीमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Oct 16, 2026, 05:46 PM IST|Updated: Oct 16, 2026, 05:53 PM IST
joinshare
6,6,6,6,6,6,6,6,4,4,4,4... वीरेंद्र सेहवागच्या मुलाने घातला मैदानावर धुमाकूळ! खेळली 173 धावांची धडाकेबाज खेळी

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शुक्रवार, 16 ऑक्टोबर रोजी विजयनगरमध्ये विनू मांकड ट्रॉफी स्पर्धा सध्या सुरु आहे, या स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू सहभाग झाले आहेत. मागील काही काळापासून भारताचा माजी स्टार खेळाडू वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग मागील काही दिवसांपासून त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने भारतीय अंडर 19 संघासाठी निवड झाली होती, आता त्याने देशांतर्गत सामन्यामध्ये संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. विजयनगरम येथील डॉ. पीव्हीजी राजू एसीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दिल्ली विरुद्ध चंडीगढ यांच्यामध्ये सामना पार पडला, या सामन्यामध्ये आर्यवीर सेहवागने कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर वाचा.

दिल्ली विरुद्ध चंडीगढ यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये आर्यवीर सेहवागने संघासाठी दमदार कामगिरी केली. आर्यवीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली अंडर 19 संघाने या सामन्यामध्ये 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 289 धावा केल्या. कठीण परिस्थितीत आर्यवीरने सूत्रे हाती घेतली आणि एक मोठी खेळी खेळून संघाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दुसऱ्या टोकाकडून सलामीवीर अर्णव बुग्गाने 48 धावांचे योगदान दिले, दिल्लीच्या संघाला या मजबूत सुरुवात करुन दिली. पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करुन दिल्लीच्या संघाला भक्कम सुरुवात करुन दिली.

हे ही वाचा

अर्शदीप दुखापतीमुळे संघाबाहेर, बीसीसीआयने केली बदली खेळाडूची घोषणा! स्टार खेळाडू संघात सामील

आर्यवीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आर्यवीर आणि अर्णव बग्गा यांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावा जोडल्या, त्यानंतर बग्गा 47 धावांवर बाद झाला. या काळात दिल्लीने 81 धावांत चार गडी गमावले. दिल्लीची धावसंख्या अचानक 179/4 झाली. त्यानंतर आर्यवीरने शांतनु यादवसोबत पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. 46व्या षटकात आर्यवीर 173 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 19 चौकार आणि आठ उत्तुंग षटकार ठोकले.  अर्णव बाद झाल्यानंतर, त्याने आणि यष्टीरक्षक-फलंदाज अभिराज सिंगने तिसऱ्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. अभिराजने एका चौकाराच्या मदतीने 18 धावा केल्या.

आर्यवीरने सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 वर्षांखालील संघात पदार्पण केले. युवा एकदिवसीय मालिकेत, त्याने तीन डावांमध्ये केवळ 109 धावा केल्या. पावसामुळे बाधित झालेल्या पहिल्या सामन्यात, जो भारताने सात धावांनी जिंकला, आर्यवीरने 26 चेंडूंमध्ये 28 धावा केल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आर्यवीरने ४७ धावा केल्या, पण त्याचे अर्धशतक केवळ तीन धावांनी हुकले. त्यानंतर त्याने अंतिम सामन्यात 34 धावांचे योगदान दिले. दिल्ली प्रीमियर लीगमध्ये वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून खेळणाऱ्या आर्यवीरने मोठ्या स्पर्धांमध्ये आधीच अनुभव मिळवला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cricket News
Sports News
Marathi News