SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

WTC गुणतालिकेमध्ये मोठा फेरबदल, दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडकडून हिसकावलं पहिले स्थान

जागतिक कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी अनेक संघाची रस्सीखेच सुरु आहे. आता गुणतालिकेमध्ये कोणते बदल झाले आहेत यासंदर्भात संपूर्ण सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 19, 2026, 20:51 IST | Updated: Nov 19, 2026, 21:02 IST
Join

जागतिक कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी अनेक संघाची रस्सीखेच सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दमदार कामगिरी करत मागील चॅम्पियनशीप ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत करुन नावावर केली होती. दक्षिण आफ्रिकेने दमदार फॅार्म कायम ठेवत आतापर्यत या सायकलमध्ये देखील फायनलमध्ये स्थान मिळवण्याचा त्याचा प्रयत्न सुरु आहे. आता दक्षिण आफ्रिकेने गुणतालिकेमध्ये मोठे फेरबदल केले आहे, आता गुणतालिकेमध्ये कोणते बदल झाले आहेत यासंदर्भात संपूर्ण सविस्तर वाचा.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये सामना आज पार पडला, या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर नऊ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला. या विजयानंतर आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप गुणतालिकेमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. बांगलादेशने पहिल्या डावात 400 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 557 धावा करून 157 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात बांगलादेशचा संघ अवघ्या 168 धावांवर सर्वबाद झाला, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी केवळ 12 धावांचे लक्ष्य होते, जे यजमानांनी सहज गाठले.

हे ही वाचा

शुभमन गिल मैदानावर पंचांशी भिडला, बुमराहही संतापला! नक्की झाले काय? पहा Video

दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) 2025-27 च्या गुणतालिकेत लक्षणीय बदल झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या या विजयामुळे दक्षिण आफ्रिका आता पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. गतविजेत्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला मागे टाकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. टेंबा बावुमाच्या नेतृत्वाखालील संघाचा सध्याच्या डब्ल्यूटीसी चक्रातील आठ सामन्यांमधील हा सहावा विजय आहे. या विजयामुळे प्रोटीज संघाची गुण टक्केवारी (पीसीटी) 75 पर्यंत वाढली असून, ते अव्वल संघ बनले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे न्यूझीलंडला मोठा धक्का बसला असून, 72.22 च्या पीसीटीसह ते दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. त्यांच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया 69.23 पीसीटीसह तिसऱ्या स्थानावर, तर भारत 51.52 पीसीटीसह चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, या पराभवामुळे बांगलादेशला मोठे नुकसान झाले आहे. त्यांचा पीसीटी 40.74 पर्यंत घसरला असला तरी, संघ पाचव्या स्थानावर कायम आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES