SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुलाच्या भविष्यासाठी दरमहा फक्त 5 हजारची एसआयपी! 15 वर्षांनी किती फंड मिळेल? पाहा संपूर्ण गणित

दरमहा छोटी रक्कम गुंतवून दीर्घकाळ शिस्तीने गुंतवणूक करणे हा या गणिताचा मुख्य मुद्दा आहे.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Sep 29, 2026, 04:43 PM IST | Updated: Sep 29, 2026, 05:15 PM IST
Image Credit: मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करताना केवळ अपेक्षित परताव्याकडे पाहणे पुरेसे नाही. भविष्यात किती रक्कम लागणार आहे, लक्ष्य किती वर्षांनी आहे, किती जोखीम स्वीकारता येईल आणि दरमहा किती गुंतवणूक शक्य आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे.
Join

मुलांच्या शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी किंवा भविष्यातील इतर गरजांसाठी पालकांना मोठी रक्कम लागते. त्यामुळे सुरुवातीपासूनच नियोजन करून गुंतवणूक सुरू केली तर दीर्घकाळात मोठा निधी तयार होऊ शकतो. म्युच्युअल फंडातील सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपी हा त्यासाठी वापरला जाणारा एक पर्याय आहे. दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवून दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास कंपाउंडिंगचा फायदा मिळू शकतो. दरमहा ₹5,000 एसआयपी केली आणि सरासरी 12% वार्षिक परतावा मिळाला, तर 15 वर्षांनंतर किती निधी तयार होऊ शकतो, याचे गणित समजून घेऊया.

दरमहा ₹5,000 गुंतवल्यास?

समजा तुम्ही मुलाच्या भविष्यासाठी दर महिन्याला ₹5,000 एसआयपी सुरू केली. एका वर्षात तुमची एकूण गुंतवणूक ₹60,000 होईल. ही SIP सलग 15 वर्षे सुरू ठेवली तर तुमच्या खिशातून जाणारी एकूण रक्कम ₹9 लाख असेल. याचे साधे गणित असे ₹5,000 × 12 महिने × 15 वर्षे = ₹9,00,000. म्हणजे 15 वर्षांच्या कालावधीत तुम्ही एकूण ₹9 लाख गुंतवाल.

किती फंड तयार होऊ शकतो?

आता या गुंतवणुकीवर सरासरी 12% वार्षिक परतावा मिळाल्याचे गृहीत धरू. मासिक कंपाउंडिंगच्या आधारावर ₹5,000 ची SIP 15 वर्षे सुरू ठेवल्यास अंदाजे ₹23,79,657 इतका निधी तयार होऊ शकतो.यामध्ये तुमची मूळ गुंतवणूक ₹9 लाख आहे, तर अंदाजे ₹14,79,657 इतका परतावा मिळू शकतो. म्हणजेच एकूण फंड जवळपास ₹23.80 लाख होऊ शकतो.
मात्र हा आकडा निश्चित नाही. म्युच्युअल फंडातील परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो.

‘कंपाउंडिंग’चा फायदा कसा मिळतो?

SIPमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्यामागे कंपाउंडिंग हा महत्त्वाचा घटक असतो. सुरुवातीच्या काळात गुंतवणुकीत होणारी वाढ तुलनेने कमी दिसू शकते. मात्र कालावधी वाढत गेल्यावर आधी मिळालेल्या परताव्यावरही पुढील परतावा मिळण्याची शक्यता निर्माण होते.यामुळे छोटी मासिक बचतही दीर्घकाळात मोठ्या निधीत रूपांतरित होऊ शकते. त्यामुळे मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक सुरू करताना शक्य तितक्या लवकर सुरुवात करणे महत्त्वाचे ठरू शकते.

12% परतावा निश्चित किंवा हमीचा आहे का?

इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12% परतावा हा गृहीत धरलेला अंदाज आहे. तो कोणत्याही म्युच्युअल फंडाकडून हमीने मिळणारा परतावा नाही. बाजाराशी संबंधित गुंतवणुकीत परतावा कमी-जास्त होऊ शकतो आणि गुंतवलेल्या पैशाची बाजारमूल्यही वाढू किंवा घटू शकते.त्यामुळे ₹23,79,657 ही रक्कम फक्त 12% सरासरी परतावा गृहीत धरून केलेली गणना आहे. प्रत्यक्षात मिळणारा अंतिम निधी बाजारातील परिस्थिती, गुंतवणुकीचा प्रकार आणि परताव्याच्या दरावर अवलंबून असेल.

एसआयपी वाढवत गेल्यास फंड आणखी मोठा

उत्पन्न दरवर्षी वाढत असेल तर एसआयपीची रक्कमही हळूहळू वाढवता येते. याला स्टेप अप एसआयपी म्हटले जाते. उदाहरणार्थ, ₹5,000 पासून सुरुवात करून दरवर्षी ठराविक टक्केवारीने एसआयपीवाढवली तर 15 वर्षांनंतर तयार होणारा निधी साध्या ₹5,000 मासिक SIPपेक्षा वेगळा आणि मोठा असू शकतो.

(Desclaimer: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी संबंधित योजनेची माहिती समजून घ्या. आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES