SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

एफडी, पीपीएफ की इतर? कशामध्ये मिळतो सर्वाधिक व्याज! कोणती गुंतवणूक फायद्याची?

सध्या पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये एससीएसएस आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 8.20% वार्षिक व्याज मिळत आहे.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 08, 2026, 10:03 PM IST | Updated: Oct 08, 2026, 10:16 PM IST
Image Credit: सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा मिळवण्याचा विचार करणाऱ्यांसाठी बँक एफडी, पीपीएफ, एनएससी, एससीएसएस आणि पोस्ट ऑफिसच्या योजना हे लोकप्रिय पर्याय आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर 2026 या तिमाहीत केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. त्यामुळे सध्या कोणत्या योजनेत किती व्याज मिळत आहे, याची तुलना करणे महत्त्वाचे ठरते.
Join

सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा मिळवण्याचा विचार करणाऱ्यांसाठी बँक एफडी, पीपीएफ, एनएससी, एससीएसएस आणि पोस्ट ऑफिसच्या योजना हे लोकप्रिय पर्याय आहेत. ऑक्टोबर-डिसेंबर 2026 या तिमाहीत केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवले आहेत. त्यामुळे सध्या कोणत्या योजनेत किती व्याज मिळत आहे, याची तुलना करणे महत्त्वाचे ठरते.


पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये किती व्याज?

सध्या पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये एससीएसएस आणि सुकन्या समृद्धी योजनेवर 8.20% वार्षिक व्याज मिळत आहे. एनएससीवर 7.70%, पीपीएफवर 7.10%, तर 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 7.50% व्याज आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी हे दर मागील तिमाहीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत.

पीपीएफमध्ये 7.10% व्याज

पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हा दीर्घकालीन बचतीसाठी लोकप्रिय पर्याय आहे. सध्या पीपीएफ वर 7.10% वार्षिक व्याज मिळत आहे. या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा असल्याने अल्पकालीन गुंतवणुकीपेक्षा दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी तो अधिक योग्य ठरू शकतो. त्यामुळे निवृत्ती किंवा दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी PPFचा विचार केला जातो.  

ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना 

सिनीअर सिटीझन सेव्हिंग स्किम्स (SCSS) मध्ये सध्या 8.20% व्याज मिळत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीत नियमित उत्पन्नाचा विचार करणाऱ्या पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरते. दुसरीकडे, एनएससीवर 7.70% आणि 5 वर्षांच्या पोस्ट ऑफिस ठेवीवर 7.50% व्याज मिळत आहे. त्यामुळे केवळ व्याजदराच्या दृष्टीने एससीएसएस सध्या या प्रमुख सरकारी बचत पर्यायांमध्ये आघाडीवर आहे.


मोठ्या बँकांच्या FDपेक्षा काही पोस्ट ऑफिस योजना पुढे

2 ऑक्टोबर 2026 च्या उपलब्ध आकडेवारीनुसार एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या 1-2 वर्षांच्या FDवर सुमारे 6.45%, आयसीआयसीआय बँकेवर 6.30%,एक्सिस बँकेवर 6.50% आणि कोटक बँकेवर 6.65% व्याज आहे. काही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये हा दर 6.60% पर्यंत आहे. मात्र काही स्मॉल फायनान्स बँका आणि इतर ठेवीदार संस्थांमध्ये यापेक्षा जास्त दर मिळू शकतात. त्यामुळे FD करताना फक्त आपल्या बँकेचा दर पाहण्याऐवजी इतर पर्यायांची तुलना करणे महत्त्वाचे आहे.


फक्त व्याजदर पाहून गुंतवणूक करू नका

उच्च व्याजदर म्हणजे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी सर्वोत्तम पर्याय असे नाही. गुंतवणुकीचा कालावधी, पैसे कधी लागणार आहेत, कराचे परिणाम, पैसे काढण्याची सुविधा, गुंतवणुकीची मर्यादा आणि जोखीम यांचाही विचार करावा. उदाहरणार्थ, पीपीएफ दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी आहे, तर एफडी तुलनेने अधिक लवचिक ठरू शकते. सध्या सरकारी छोट्या बचत योजनांचे दर आकर्षक असले तरी भविष्यात सरकारकडून त्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी आपल्या आर्थिक उद्दिष्टांनुसार पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES