धक्कादायक! देशातील सोन्याबद्दल हादरवणारी माहिती समोर; 5 वर्षांपासून 83 % सराफांच्या दुकानांतील सोनं...
भारतातील सराफा दुकानांबद्दल कॅगच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्राहकांनो तुम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये सोनं घेतलं का? तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
भारतात सण असो किंवा इतर प्रसंग इथे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात येते.हॉलमार्कमध्ये शुद्ध सोन्याची गॅरेंटी असं मानलं जातं. पण आता याच सोन्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅगच्या अहवालातून सोन्याबद्दल महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या रिपोर्टनुसार देशातील BIS ने 83 टक्क्याहून अधिक सोन्याची दुकाने तपासलेली नाही. या बातमीनंतर एकच खळबळ माजली आहे. तर ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
रिपोर्टमधून काय समोर आलंय?
भारतीय मानक ब्युरो म्हणजे BIS ही भारतातील अशी संस्था आहे जी सराफ दुकानांची वर्षातून एकदा तपासणी करतात. या तपासणी दरम्यान दुकानातील सोन्याच्या दागिण्याची शुद्धता तपासली जाते. पण कॅगच्या रिपोर्टनुसार गेल्या पाच वर्षांमध्ये 2020- 21 ते 2024-25 मध्ये या दरम्यान 83 टक्क्याहून अधिक सोन्याच्या दुकान्यातील सोन्याची तपासणी केलेली नाही.
रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे, त्यानुसार देशभरातील 392 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्कशिवाय सोने विकणे बेकायदेशीर आहे. म्हणूनच सुमारे 2.3 लाख दागिन्यांच्या दुकानांनी बीआयएस (BIS) कडे नोंदणी करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार 2024-25 मध्ये एकूण 28,865 परवानाधारक होते. पण त्यापैकी फक्त 5,444 जणांची तपासणी करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की सुमारे 81% दुकानदारांची कोणीही तपासणी झालेली नाही.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात. ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.