SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मुंबईत लॉटरीशिवाय खरेदी करता येणार म्हाडाचे घर, 118 घरांसाठी लवकरच जाहिरात काढणार?

मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. काय आहे ही बातमी जाणून घेऊयात सविस्तर

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Sep 30, 2026, 01:29 PM IST | Updated: Sep 30, 2026, 01:33 PM IST
Image Credit: MHADA homes in Mumbai can be purchased without a lottery
Join

स्वतःचे हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. त्यामुळं मुंबई-पुणे या महानगरांतील अनेक लोक म्हाडाच्या लॉटरीवर अवलंबून असतात. अलीकडेच म्हाडाची एक लॉटरी जाहिर झाली होती. मात्र यंदाही ज्यांचे घराचे स्वप्न साकार झाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय.

'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेअंतर्गत म्हाडाने फेब्रुवारीत मुंबईतील 118 घरांसाठी जाहिरात काढली होती. मात्र बाजारभावापेक्षा अधिक किंमत असल्याने या योजनेतील निम्म्याहून अधिक घरे शिल्लक आहेत. त्यामुळे काही घरांच्या किमती कमी करून नव्याने या घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सोडतीत विक्री न झालेल्या घरांच्या देखभालीवर म्हाडाला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. प्राधिकरणाच्या धोरणानुसार, दोन वेळा सोडतीत समावेश करूनही विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या घरांची विक्री म्हाडाकडून 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर केली जाते.

मुंबईत पहिल्यांदाच लॉटरीशिवाय घरे घेण्याची संधी मिळणार असल्यामुळे 118 घरांच्या जाहिरातीला तुफान प्रतिसाद मिळेल असे म्हाडाला वाटले होते, मात्र यातील निम्म्याहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे या घरांची विक्री करायची कशी, असा प्राधिकरणापुढे पेच आहे. सोमवारी म्हाडा मुख्यालयात झालेल्या बैठकीत 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेतील घरांना अपेक्षित प्रतिसाद का मिळाला नाही, याबाबत अभ्यास करून अहवाल तयार करण्याच्या सूचना म्हाडा उपाध्यक्षांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच शक्य तिथे घराच्या किमती कमी करण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES