SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ऑनलाइन शॉपिंगचे सरकारने बदलले नियम, खरेदीचे नियम बदलणार! कोणकोणते नियम लागू होणार?

तुम्ही जवळच्या बाजारामध्ये जाण्यापेक्षा ऑनलाईन शॅापिंग करणे पसंत करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरु शकते. ऑनलाईन शॅापिंगच्या नियमांमध्ये सरकार मोठे बदल करणार आहे हे बदल कोणते असणार आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Nov 19, 2026, 19:33 IST | Updated: Nov 19, 2026, 19:55 IST
Join

जर तुम्हालाही ऑनलाईन शॅापिंग करायची सवय असेल आणि तुम्ही जवळच्या बाजारामध्ये जाण्यापेक्षा ऑनलाईन शॅापिंग करणे पसंत करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरु शकते. जर तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा इतर कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून वारंवार ऑनलाइन खरेदी करत असाल, तर आता शॅापिंगच्या नियमांमध्ये काही मोठे आणि महत्त्वाचे बदल होणार आहेत. मेगा सेल किंवा ऑफर अनेक ऑनलाइन शॅापिंग प्लॅटफॉर्मवरून दिली जाते पण अनेकांना ऑनलाइन सेल दरम्यान उत्पादनांवर 50 ते 80 टक्के सूट दाखवली जाते, परंतु ग्राहकांना किमतीतील खरी घट अनेकदा समजत नाही.

अनेकदा काही वेबसाइट्स अतिरिक्त शुल्क आकारतात आणि काही मोठ्या ऑफर देतात ज्यामुळे त्यांच्याकडे ग्राहक घाईघाईने खरेदी करण्यास प्रवृत्त होतात. आता, अशा समस्या कमी करण्यासाठी सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांसाठी नियम बदलले आहेत. सरकार कोणकोणते नवे नियम लागू करणार आहे यासंदर्भात सविस्तर तुम्हाला या लेखामध्ये माहिती देणार आहोत. ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम, 2020 मध्ये सुधारणा केल्यानंतर, नवीन नियम 1 जानेवारी 2027 पासून लागू होतील. या नियमांनुसार, कंपन्यांना सवलतीसह गेल्या 30 दिवसांतील सर्वात कमी किंमत प्रदर्शित करावी लागेल.

ऑनलाइन शॉपिंगचे नियम बदलणार

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES