• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /कामाची बातमी
  • /प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेत आता 'या' वेळेत फोन, लॅपटॉप चार्जिंग करता येणार नाही

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रेल्वेत आता 'या' वेळेत फोन, लॅपटॉप चार्जिंग करता येणार नाही

रेल्वेत रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत चार्जिंग बंद ठेवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने हा निर्णय घेतल्याचे बोलले जातेय.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 29, 2026, 09:13 AM IST|Updated: Oct 29, 2026, 09:20 AM IST
joinshare
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!  रेल्वेत आता 'या' वेळेत फोन, लॅपटॉप चार्जिंग करता येणार नाही
Image Credit: Railways to turn off charging points in train

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

2

IAS रूबल अग्रवाल यांचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचे नगरसेवक पद अखेर रद्द

3

मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पूर्णेकर हत्या प्रकरणी त्यांनी...'

4

हार्दिक पांड्याच्या ट्रेडसंदर्भात आर अश्विनचा मोठा दावा! CSK चे 'हे' तीन खेळाडू द्यावे लागणार?

5

50 लाख प्रवासी, 3 कंपन्या अन् 3 नोव्हेंबर 2026 ची डेडलाईन... नवी मुंबई एअरपोर्टसंदर्भात मोठी अपडेट

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

लांबचा रेल्वे प्रवास असेल तेव्हा अनेकजण ट्रेनमध्ये देण्यात आलेल्या चार्जिंग पोर्टलाच फोन चार्जिंगसाठी लावतात. पण आता तुम्हाला एका ठराविक वेळेपर्यंतच रेल्वे प्रवासात फोन चार्जिंग करता येणार आहे. 

रेल्वे प्रवासात आता रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत मोबाइल आणि लॅपटॉप चार्जिंग करता येणार नाही. आग लागण्याचा धोका टाळण्यासाठी चार्जिंगची विद्युत जोडणी बंद ठेवणे बंधनकारक असल्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने पुन्हा जारी केले आहेत. 2014 मध्ये जारी केलेल्या या आदेशाची सर्व रेल्वे विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.

दक्षिण पूर्व रेल्वे विभागात नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर बोर्डाने हे निर्देश दिले आहेत. संबंधित वेळेत डब्यातील चार्जिंगची जोडणी बंद करण्यात आली नव्हती. त्यादरम्यान एका प्रवाशाची पॉवर बँक चार्जिंग करताना फुटली आणि त्यातून धूर निघाला. या घटनेची दखल घेत रेल्वे बोर्डाने 26 ऑक्टोबर रोजी सर्व विभागांना पत्र पाठवले आहे

रेल्वेतील चार्जिंगची जोडणी ठरवून दिलेल्या वेळेत बंद राहील, याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्यांवर असेल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.  यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच, वरिष्ठ अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी अचानक तपासण्या कराव्यात, असे बोर्डाने म्हटले आहे.

2014मध्येही घेतलेला निर्णय

2014 मध्येही पहिल्यांदा असा निर्णय घेण्यात आला होता. रेल्वे बोर्डाने जून 2014 मध्ये पहिल्यांदा रेल्वेतील विद्युत जोडणी रात्रीच्या वेळी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. 2013 मध्ये हजूर साहिब नांदेड-केएसआर बंगळुरू एक्स्प्रेसच्या वातानुकूलित तृतीय श्रेणीच्या डब्यात आग लागली होती. या घटनेनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी चार्जिंगसाठी असलेली विद्युत जोडणी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत बंद ठेवण्याची शिफारस केली होती. मात्र, प्रवाशांची सोय लक्षात घेत रेल्वे बोर्डाने रात्री 11 ते पहाटे 5 ही वेळ ठरवली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Railway News
india