SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सहा महिन्यांत सोने 2.38 लाख प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचेल? अर्थशास्त्रज्ञांच्या धक्कादायक भाकीतमुळे एकच खळबळ

अर्थशास्त्रज्ञ अॅलास्टेयर मॅकलॉड यांच्या मते, अमेरिकन डॉलरच्या कमकुवतपणामुळे आणि पत बाजारातील वाढत्या जोखमींमुळे, पुढील 6 महिन्यांत सोन्याचा भाव वधारणार आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 28, 2026, 15:09 IST | Updated: Nov 28, 2026, 21:02 IST
Image Credit: gold prediction
Join

या वर्षात आपण सोने - चांदीचे दर एवढे वाढताना पाहिले की, सोनं हे ग्राहकांच्या खरेदीच्या बाहेर गेला. भारतीय लोक मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक करतात. सोन्याची गुंतवणूक ही अतिशय सुरक्षित मानली जाते. गेल्या चार पाच दिवसात सोन्याचे किंमतीत घसरण पाहिला मिळाली. पण काल स्वस्त झालेले सोनं शनिवारी (28 नोव्हेंबरला) पुन्हा महाग झालं. नवीन वर्षात 2027 मध्ये 10 ग्रॅम सोनं हे 2.38 लाखांच्या घरात जाईल, अशी शक्यता प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आणि वित्तीय विश्लेषक अ‍ॅलेस्टेयर मॅकलॉड यांनी वर्तवली आहे. 

सोनं महाग होत नाहीये तर...

MINING.COM च्या 'टॉप ऑफ माइन' या कार्यक्रमात मॅकलॉड यांनी ही भीती व्यक्त केली. या कार्यक्रमातून सोन्याबद्दल असलेला मोठ्या गैरसमज त्यांनी दूर केला आहे. जेव्हा सोन्याची किंमत वाढते तेव्हा लोकांना वाटतं धातूचे मूल्य वाढतं. पण मॅकलॉड यांनी सांगितलं की, सोन्याची किंमत वाढते म्हणजे सोन्याच्या मूल्यातील प्रत्यक्ष ती वाढ नसते. तर हा परिणाम अमेरिकन डॉलरच्या कमकुवतपणामुळे असतं. ते म्हणाले की, बहुतेक गुंतवणूकदार या मूलभूत वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. जेव्हा एखाद्या चलनाची क्रयशक्ती कमी होते, तेव्हा सोने संरक्षणाचे सर्वात विश्वसनीय साधन मानले जाते. 

बाजारात बऱ्याच काळापासून असा समज पण आहे की, जेव्हा अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदर वाढवते, तेव्हा सोन्याच्या किमतीत वाढ होते. त्यांनी यामागील कारणही सांगितलं ते म्हणाले की,  सोन्यावर कोणतेही व्याज किंवा परतावा मिळत नसतो. ज्यामुळे गुंतवणूकदारांना व्याज देणाऱ्या साधनांकडे वळण्यास भाग असतं. ते पुढे असंही म्हणाले की, फेडरल रिझर्व्हच्या पुढील संभाव्य व्याजदरवाढीबद्दलची अनिश्चितता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकन चलनावर घोंघावणाऱ्या मोठ्या धोक्यांपासून विचलित करताना दिसत आहे. सोन्याचे मूल्यमापन केवळ व्याजदरांच्या आधारावर करणे ही एक गंभीर चूक ठरणार यात काही शंका नाही.

हेसुद्धा वाचा - सोनं 64 हजार तर चांदी 2.82 लाखांनी सस्त; 2026 सर्वात मोठी घरसण, सोनं चांदीचे इतके कमी रेट पाहून शॉक व्हाल

मॅकलॉड यांनी या कार्यक्रमातून अमेरिकेच्या वित्तीय प्रणालीतील वाढत्या धोक्यांबद्दलही इशारा देत म्हटलं की, प्रत्यक्षात अमेरिकन गुंतवणूकदारांकडे सोन्याचा साठा खूपच कमी आहे. तर शेअर बाजार गंभीर मंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे. जर अमेरिकेतील बाजारात पैशांची चणचण भासू लागली तर खूप मोठी समस्या निर्माण होईल. तर गुंतवणूकदारांना पैसे उभारण्यासाठी सर्व प्रकारची मालमत्ता विकण्याची वेळ येऊ शकते. मॅकलॉड यांनी स्पष्टपणे सांगितलं की, खरा धोका सोन्यात नसून पत बाजारात आहे, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे, कर्जावर आधारित गुंतवणूक टाळावी लागणार आहे. तसंच प्रत्यक्ष सोने बाळगणे हा एक अधिक सुरक्षित पर्याय भविष्यात असणार आहे.

 


Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES