• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /काँग्रेसच्या बड्या नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन

काँग्रेसचे 30 वर्षांचे निष्ठावंत नेते ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसनेते मोठा पक्ष प्रवेश झाला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 29, 2026, 21:09 IST|Updated: Nov 29, 2026, 21:16 IST
joinshare
काँग्रेसच्या बड्या नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश;  शेकडो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
सोनं 1 लाखांच्या खाली येणार की पुन्हा महागणार? तज्ज्ञांनी दिला पुढील 6 महिन्यांचा अंदाज; पाहा किती असेल दर!

सोनं 1 लाखांच्या खाली येणार की पुन्हा महागणार? तज्ज्ञांनी दिला पुढील 6 महिन्यांचा अंदाज; पाहा किती असेल दर!

2

काँग्रेसच्या बड्या नेत्याचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश; शेकडो कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन

3

रांचीमध्ये बनतय एम एस धोनीचं नवं घर, 40 कोटींच्या या घरात असं काय असणार खास? Video समोर

4

आपले पैसे वाचवून ठेवा,पुढच्या काळात मोठे आव्हान उभे ठाकणार; खुद्द अर्थ मंत्रालयाचे संकेत;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

5

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

हिंगोली :  राज्याच्या राजकारणात सध्या मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच हिंगोली जिल्ह्यात मात्र राजकीय पक्षांतरांना वेग आला आहे. काँग्रेस,भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे.

विशेष म्हणजे, गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेसमध्ये निष्ठेने काम करणारे जॅकी उस्मान कुरेशी यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.माजी प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलेल्या कुरेशी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात या पक्षप्रवेशाची विशेष चर्चा रंगली आहे केवळ काँग्रेसच नव्हे,तर भाजपलाही या पक्षप्रवेशामुळे धक्का बसल्याचं चित्र आहे.

गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केलेले भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष बालाजी वानखेडे यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला आहे.याशिवाय शिंदेसेनेसह विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवबंधन बांधलं आहे.ठाकरे शिवसेनेचे हिंगोली जिल्हाप्रमुख संदेश देशमुख आणि परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत आगामी राजकीय वाटचालीचा नवा अध्याय सुरू केला आहे.

एकीकडे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय पक्षांमध्ये संघर्ष सुरू असताना दुसरीकडे हिंगोलीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये काय बदल होणार,आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे शिवसेनेला याचा किती फायदा होणार आणि काँग्रेस-भाजपसह शिंदेसेनेसमोर कोणती आव्हानं उभी राहणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
shiv sena
Maharashtra Politics
Political News