SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

IAS, IPS, IFS की IRS? कोणत्या सरकारी अधिकाऱ्याला मिळतो सर्वाधिक पगार? ऐकून वाटेल आश्चर्य!

सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार या सेवांतील अधिकाऱ्यांचे सुरुवातीचे मूलभूत वेतन साधारणपणे दरमहा 56100 रुपये असते.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 10, 2026, 07:26 PM IST | Updated: Oct 10, 2026, 07:48 PM IST
Image Credit: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न लाखो विद्यार्थी पाहतात. मात्र, आयएएस (IAS), आयपीएस (IPS), आयएफएस (IFS) आणि आयआरएस (IRS) या सेवांपैकी सर्वाधिक पगार कोणाला मिळतो, असा प्रश्न अनेक उमेदवारांना पडतो. या चारही सेवांमध्ये सुरुवातीचे मूलभूत वेतन साधारण समान असते. मात्र, पदोन्नती, वरिष्ठ पदे, परदेशातील नियुक्ती आणि विशेष भत्ते यांमुळे एकूण वेतन व सुविधांमध्ये फरक पडतो.
Join

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न लाखो विद्यार्थी पाहतात. मात्र, आयएएस (IAS), आयपीएस (IPS), आयएफएस (IFS) आणि आयआरएस (IRS) या सेवांपैकी सर्वाधिक पगार कोणाला मिळतो, असा प्रश्न अनेक उमेदवारांना पडतो. या चारही सेवांमध्ये सुरुवातीचे मूलभूत वेतन साधारण समान असते. मात्र, पदोन्नती, वरिष्ठ पदे, परदेशातील नियुक्ती आणि विशेष भत्ते यांमुळे एकूण वेतन व सुविधांमध्ये फरक पडतो.

IAS, IPS, IFS आणि IRS यांचे सुरुवातीचे वेतन किती?

सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार या सेवांतील अधिकाऱ्यांचे सुरुवातीचे मूलभूत वेतन साधारणपणे दरमहा 56100 रुपये असते. याशिवाय महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि लागू असलेले इतर भत्ते मिळू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष हातात मिळणारी रक्कम नियुक्तीचे ठिकाण, सरकारी निवासाची सुविधा, कर आणि इतर कपातींवर अवलंबून असते.

आयएएस अधिकाऱ्यांना सर्वाधिक वेतनाची संधी

भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच आयएएस मध्ये अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासन, राज्य शासन आणि केंद्र सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळते. सेवेत पदोन्नती मिळाल्यानंतर वेतनश्रेणी वाढत जाते. सर्वोच्च प्रशासकीय पद असलेल्या कॅबिनेट सचिव पदासाठी मूलभूत वेतन दरमहा 2.50 लाख रुपये निश्चित आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांना वेतनासोबत सुरक्षा आणि प्रशासकीय सुविधा

भारतीय पोलीस सेवा म्हणजे आयपीएस ही देशातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हे तपास आणि अंतर्गत सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची सेवा आहे. आयपीएस अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस महासंचालक यांसारख्या पदांवर काम करण्याची संधी मिळते. वरिष्ठ पदांवर मूलभूत वेतन साधारणपणे 2.25 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. पद आणि नियुक्तीनुसार सरकारी वाहन, सुरक्षा व्यवस्था आणि अधिकृत निवास यांसारख्या सुविधा मिळू शकतात.

आयएफएस अधिकाऱ्यांना परदेशात नियुक्तीचा आर्थिक फायदा

भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजे आयएफएस मधील अधिकारी भारताचे परदेशातील राजनैतिक संबंध सांभाळतात. त्यांची परदेशातील दूतावास, उच्चायुक्तालये आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये नियुक्ती होऊ शकते. भारतात असताना त्यांचे मूलभूत वेतन इतर सेवांप्रमाणेच संबंधित वेतनश्रेणीनुसार असते. मात्र, परदेशात नियुक्ती झाल्यावर देश आणि पदानुसार परदेशी भत्ता, निवास आणि इतर सुविधा मिळू शकतात.  

IRS अधिकाऱ्यांचे वेतन आणि कामाचे स्वरूप

भारतीय महसूल सेवा म्हणजे IRS मध्ये आयकर, सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर प्रशासनाशी संबंधित जबाबदाऱ्या असतात. या सेवेतही सुरुवातीचे मूलभूत वेतन साधारण 56,100 रुपये असते. वरिष्ठ पदांवर वेतन 2.25 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. पदोन्नतीनुसार जबाबदाऱ्या वाढतात आणि विविध प्रशासकीय सुविधा मिळू शकतात. आयएएसमध्ये सर्वोच्च मूलभूत वेतनाची मर्यादा अधिक असली, तरी आयआरएसमध्ये करप्रशासन, आर्थिक तपासणी आणि महसूल व्यवस्थापन या क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES