मलायका अरोरानंतर अर्जुन कपूर 10 वर्ष लहान अभिनेत्रीला करतोय डेट? फोटोमुळे चर्चांना उधाण
मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्याचे समोर आल्यानंतर अर्जुन कपूरचे नाव हे आता दुसऱ्या अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या फोटोनंतर त्यांच्या डेटींगच्या अफवांना जोर आला आहे.
अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका यांचा काही महिन्यापूर्वी ब्रेकअप झाल्याचे वृत समोर आले होते. त्यानंतर चालू 'कॉफी विथ करण'च्या भागामध्ये मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्याचे अभिनेत्याने सांगितले होते. आता अभिनेता अर्जुन कपूरचे नाव हे आता दुसऱ्या अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे, सोशल मिडियावर अभिनेत्याने एक फोटो शेअर केला होता त्यानंतर अफवा सोशल मिडियावर पसरल्या आहेत. अर्जुन कपूर आणि साहिबा बाली हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत, या दोघांचे नाव जोडले जात असल्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी देखील हे दोघे भारताचा सामना पाहण्यासाठी एकत्र दिसले होते.
अर्जुन कपूर आणि साहिबा बाली यांनी त्यांच्या सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला होता यामध्ये दोघेही गुरुपूरबच्या निमित्ताने अभिनेत्रीने अर्जुन कपूरसोबत फोटो शेअर केला होता. सोशल मिडियावर साहिबा बालीने शेअर केलेल्या फोटोनंतर हा फोटो काही वेळातच वेगाने व्हायरल झाला आणि त्यांच्या डेटींगच्या अफवांना उधाण आले. दोन्ही कलाकार लंडनच्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवरही एकत्र दिसले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा भारताच्या क्रिकेट सामन्याच्या वेळी जेव्हा डेटींगच्या अफवा सुरु होत्या त्यावेळी साहिबाने प्रतिक्रिया दिली होती.
कोण आहे साहिबा बाली?
साहिबा बाली एक अभिनेत्री, क्रीडा निवेदिका आणि कंटेंट क्रिएटर आहे. तिने 2017 मध्ये 'डिअर माया' या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती 2018 मध्ये 'लैला मजनू' मध्ये दिसली. तिने 'अमर सिंग चमकिला', 'बार्ड ऑफ ब्लड' आणि 'तनव' यांसारख्या ओटीटी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिने अनेक क्रीडा स्पर्धांचे सूत्रसंचालनही केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी, तिने दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने यूकेमध्ये पुढील शिक्षण घेतले.
हे ही वाचा
'तू मला इतकं सगळं बोललास...' अक्षर कुमारला ट्विंकल खन्नाने शोच्या मध्येच खडसावलं! Video Viral
अर्जुनच्या आधी, साहिबाचे नाव कॉमेडियन कुल्लू आणि समय रैना यांच्याशी जोडले गेले होते. मात्र, साहिबाने या कथित संबंधांवर कधीही भाष्य केले नाही. आता, तिचे नाव अर्जुन कपूरसोबत जोडले जात आहे. अर्जुन कपूरने अनेक वर्ष अभिनेत्री मलायका अरोराला डेट केले आणि काही महिन्यापूर्वीच त्याच्या ब्रेकअपच्या चर्चा पाहायला मिळाल्या.