रोहित पवार : आमदार रोहित पवारांच्या मनात सध्या काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यांच्या ‘एकला चलो रे’ धोरणाने राष्ट्रवादीत सध्या अस्वस्थता असल्याचे चित्र आहे. हिवाळी अधिवेशनात रोहित पवारांच्या नेतृत्वाच टॅक्टर मोर्चा काढण्यात येतोय. पण या मोर्चात पक्षाचा झेंडा नसणारय. त्यामुळं रोहित पवारांचा कोणता अजेंडा आहे? असा प्रश्न विचारला जात आहेत. अशातच राष्ट्रावदी पक्षाने रोहित पवारांच्या मोर्चाबाबत भूमिका जाहीर केली आहे.
शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नासाठी रोहित पवारांनी न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चाची हाक दिली आहे.. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमधून मोर्चाला 4 डिसेंबरला मोर्चाला सुरूवात होणार आहे, तर 9 डिसेंबरला नागपुरातील विधान भवनावर मोर्चा धडकणार आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये आणि शेतमजुरांना २५ हजार रुपयांची मदत देण्याची प्रमुख मागणी आहे. रोहित पवारांनी जारी केलेल्या मोर्चाच्या पोस्टरवर फक्त शरद पवारांचा फोटो पहायला मिळतोय. यामुळे रोहित पवार एकटे पडल्याची चर्चा आहे. अशातच आता रोहित पवारांच्या मोर्चाबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत.
3 दिवसांपूर्वी रोहित पवारांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत अधिवेशनात शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा काढण्याची घोषणा केली. मात्र याचमुळं पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य सुरू झाले. कारण मोर्चाची घोषणा करताना रोहित पवारांनी वरिष्ठांना विश्वासात न घेतल्याचं बोललं जात आहे. खासदार सुप्रिया सुळे रोहित पवारांवर नाराज असल्याचं समजतंय. याचपार्श्वभूमीवर पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रोहित पवारांच्या मोर्चाबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली. सर्व जिल्हा प्रमुख या बैठकीत सहभागी झाले होते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रोहित पवार यांच्या मोर्च्यात सहभागी व्हावे यासाठी जिल्हा प्रमुखांना कोणत्याही थेट सूचना देण्यात आलेल्या नाहीत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. रोहित पवारांचा मोर्चा हा पक्षविरहित आहे त्यामुळं मोर्च्याला जायच्या यायच्या सूचना द्यायची गरज नाही असं शशिकांत शिंदे यांनी सांगितले. यामुळे रोहित पवारांच्या मोर्चाला पक्षाचा पाठिंबा नसल्याचे दिसत आहे.