Sanjay Raut On Supriya Sule : दिग्गज नेते शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शरद पवारांची पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे. या चर्चेबबाबत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या तर शपथविधीला जाणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
राज्याला लवकरच पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. वृत्त एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या वृत्तामुळे या चर्चेला जोर आला आहे. शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतात. यानंतर सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतात असा दावा या वृत्तपत्रात करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय आहे. या सर्व चर्चामुळे महाविकास आघाडीमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांवर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्यास त्यांच्या शपथविधी सोहळ्याला राहणार का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. सुप्रिया सुळे महायुतीच्या मुख्यमंत्री झाल्यास मी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला जाईल. त्यांनी शपथ तर घेऊ द्या मी स्वतः शपथविधी ला हजर राहिन असं संजय राऊत म्हणाले. भाजपच्या दिलदारीवर संजय राऊत यांनी उपरोधिक टीका केली आहे. उद्धव ठाकरेच अंतिम निर्णय घेतील असंही त्यांनी नमूद केलं.
सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या तर विक्रम होईल. 10 आमदार असलेल्या पक्षाला मुख्यमंत्री पद दिले तर मोछा दिलादारपणा ठरेल. यावर पक्षात चर्चा होईल आणि उद्धव भूमिका घेतील. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री झाल्या तर आनंद आहे, स्वागत केले पाहिजे असं संज राऊत म्हणाले.
यावर सुप्रिया सुळेंनाच पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची चर्चा फेटाळून लावली आहे. 12 वर्षापासून ऐकतेय मी मुख्यमंत्री होणार, माझ्यावर अन्याय करू नका असं मिश्किल विधान केले आहे. ज्यांच्याकडे संख्याबळ त्यांचाच मुख्यमंत्री बनतो. मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर सुळेंनी हे विधान केले. लोकांनी मला काम करायला संसदेत पाठवल आहे. मी गॉसिपमध्ये वेळ घालवत नाही असं देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.