SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Breaking Bad मधील प्रसिद्ध अभिनेत्याने उचललं टोकाचं पाऊल, वयाच्या 34 व्या वर्षी निधन

ब्रेकिंग बॅडमधील अभिनेता आरजे मिट्टेने जीवन संपवलं असल्याने हॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 13, 2026, 06:14 PM IST | Updated: Oct 13, 2026, 06:23 PM IST
Join

'ब्रेकिंग बॅड' या लोकप्रिय अमेरिकन टीव्ही मालिकेतील वॉल्टर व्हाईट ज्युनियरच्या भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता आरजे मिट्टे याचे निधन झाले आहे. तो 34 वर्षांचा होता. त्याने आत्महत्या करत जीवन संपवल्याची माहिती आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये, आरजे मिट्टे मेक्सिकोमध्ये त्याचा मित्र आणि 'ब्रेकिंग बॅड'मधील सहकलाकार लुईस मोनकाडासोबत एका हॉट एअर बलूनमध्ये दिसत आहेत. दोघेही खूप मजा-मस्ती करताना दिसत आहेत, पण आरजे मिट्टे मात्र काहीसा निराश दिसत आहे. त्याच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच हा व्हिडीओ शूट केला होता.

"आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की, आमचा लाडका अभिनेता, समाजसेवक आणि दिव्यांग हक्कांचा खंदा समर्थक आरजे मिट्टे याचे दुःखद निधन झाले आहे," असे त्यांच्या प्रतिनिधीने बीबीसीला सांगितले. मिट्टे याचे सोमवारी टेक्सासमधील ब्राउन्सविले येथे निधन झाले. त्यांच्या प्रसिद्धी व्यवस्थापकाने रॉयटर्सला आत्महत्या केल्याचा वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

 

ब्रेकिंग बॅडमध्ये वडिलांची भूमिका साकारणाऱ्या ब्रायन क्रॅनस्टन यांनी इन्स्टाग्रामवर त्याला श्रद्धांजली वाहिली असून ही बातमी कळल्यानंतर आपण "अत्यंत निराश" झाल्याचे लिहिल आहे. 

वॉल्टर व्हाइट ज्युनियरच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी

आरजे मिट्टेने 2008 च्या 'ब्रेकिंग बॅड' या मालिकेत वॉल्टर व्हाईटचा मुलगा, वॉल्टर व्हाईट ज्युनियरची भूमिका साकारली. त्याचे पात्र फ्लिन या नावानेही ओळखले जात होते. ही मालिका वॉल्टर व्हाईट नावाच्या एका हायस्कूल शिक्षकाभोवती फिरते, ज्याला एका गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर तो गुन्हेगारीच्या जगात प्रवेश करतो. या मालिकेनंतर मिट्टे घराघरात पोहोचला आणि त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली, तसेच त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.

'ब्रेकिंग बॅड' ही मालिका 2008 ते 2013 या काळात प्रसारित झाली. या मालिकेने 16 एमी पुरस्कार जिंकले. 'ब्रेकिंग बॅड' व्यतिरिक्त, तो 2021 च्या 'ट्रायम्फ' या चित्रपटातही दिसला. या चित्रपटात त्याने सेरेब्रल पाल्सीशी झुंज देणाऱ्या एका हायस्कूल कुस्तीपटूची भूमिका साकारली. मिट्टे स्वतः सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त होता आणि त्याने आयुष्यभर अपंगांच्या हक्कांसाठी काम केले.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES