SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडलं! ‘CID’ फेम अभिनेत्रीने सांगितली आठवण; 13 वर्षांपासून एकटी घालवतेय जीवन

CID मालिकेतील इन्स्पेक्टर पूर्वीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंशा सय्यदने जुन्या प्रेमसंबंधाबद्दल मोठा खुलासा केला. बॉयफ्रेंडचे दुसऱ्या मुलीसोबतचे चॅट वाचल्यानंतर ब्रेकअप केले आणि गेल्या 13 वर्षांपासून ती सिंगल आहे.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 07, 2026, 10:02 PM IST | Updated: Nov 07, 2026, 10:09 PM IST
Image Credit: सीआयडी फेम अभिनेत्री अंशा सय्यद
Join

लोकप्रिय टीव्ही मालिका सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर पूर्वीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंशा सय्यद सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अंशाने नुकत्याच सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या मुलाखतीत तिच्या प्रेमसंबंधांबद्दल आणि ब्रेकअपबद्दल मनमोकळेपणाने सांगितले. पडद्यावर गुन्हेगारांचा शोध घेणारी मी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र एका नात्यातील विश्वासघाताचा अनुभव घेतल्याचे तिने सांगितले. तिच्या या खुलाशानंतर चाहत्यांमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

लग्नापर्यंत पोहोचलेलं नातं, पण मिळाला विश्वासघात

अंशाने सांगितले की, माझे एका व्यक्तीसोबत सुमारे तीन वर्षे प्रेमसंबंध होते. हे नाते अतिशय मनापासून होते आणि दोघेही लग्न करण्याच्या विचारात होतो. मात्र, ज्याच्यासोबत आयुष्य घालवण्याची स्वप्ने पाहिली, तोच व्यक्ती एकाच वेळी दुसऱ्या मुलीलाही डेट करत असल्याचे मला समजल्याचे अंशाने सांगितले. याप्रकारामुळे मला मोठा धक्का बसल्याचे तिने सांगितले. विश्वासावर उभे असलेले नाते अशा पद्धतीने संपेल, अशी अपेक्षा मला नव्हती, असेही ती म्हणाली.

फेसबुक चॅटमुळे समोर आला बॉयफ्रेंडचा खरा चेहरा

मला बॉयफ्रेंडच्या फेसबुक मेसेजमध्ये दुसऱ्या मुलीसोबतच्या चॅट दिसल्या होत्या. त्यातून तो आपल्यासोबत असतानाच दुसऱ्या मुलीशीही संबंध ठेवत असल्याचे माझ्या लक्षात आल्याचे अंशाने सांगितले. यानंतर मी त्याला जाब विचारला आणि नाते संपवण्याचा निर्णय घेतल्याचे अंशाने सांगितले.

13 वर्षांपासून सिंगल

या ब्रेकअपनंतर अंशा गेल्या 12 ते 13 वर्षांपासून सिंगल असल्याचे तिने सांगितले. या काळात मी कोणत्याही रिलेशनशिपमध्ये आली नाही. सुरुवातीला एकटेपणा जाणवत होता. आजूबाजूच्या लोकांची लग्ने होत होती, त्यांना मुले होत होती, त्यामुळे आपल्यालाही जोडीदार असावा असे वाटायचे. समाजाकडूनही लग्नाबाबत अपेक्षा आणि प्रश्नांचा सामना करावा लागला. मात्र, मी आता आपल्या एकटेपणाशी सहज झाली असून आनंदाने आयुष्य जगतेय, असे अंशाने सांगितले.

लग्न आणि मातृत्वाबाबतही बदलला दृष्टिकोन

अंशाने यापूर्वीच्या मुलाखतीत लग्न आणि मातृत्वाबाबतही आपले विचार मांडले होते. पूर्वी तिलाही लग्न करून आई होण्याची इच्छा होती. मात्र, आता स्वतःच्या स्वातंत्र्याला आणि आनंदाला ती अधिक महत्त्व देते. आयुष्यात जोडीदार असलाच पाहिजे किंवा ठरावीक वयात लग्न झालेच पाहिजे, असे मला आता वाटत नसल्याचे अंशाने सांगितले. योग्य व्यक्ती भेटल्यास लग्नाचा विचार करेन नाहीतर सिंगल राहण्यातही मला काही अडचण नाही, असे तिने स्पष्ट केले. आयुष्याचा आनंद घेण्यासाठी लग्न किंवा नातेसंबंध असणे अनिवार्य नसल्याचे तिने स्पष्ट केले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES