• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /दिवाळीला सुट्टी असूनही फक्त 60 मिनिटांसाठी उघडणार शेअर बाजार; मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर

दिवाळीला सुट्टी असूनही फक्त 60 मिनिटांसाठी उघडणार शेअर बाजार; मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर

सोनं खरेदी प्रमाणेच दिवाळीच्या काळात शेअर्स खरेदी करणे ही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची एक परंपरा आहे. 8 नोव्हेंबर, दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचे मुहूर्त ट्रेडिंगचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 07, 2026, 09:51 PM IST|Updated: Nov 07, 2026, 09:55 PM IST
joinshare
दिवाळीला सुट्टी असूनही फक्त 60 मिनिटांसाठी उघडणार शेअर बाजार; मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
दिवाळीला सुट्टी असूनही फक्त 60 मिनिटांसाठी उघडणार शेअर बाजार; मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर

दिवाळीला सुट्टी असूनही फक्त 60 मिनिटांसाठी उघडणार शेअर बाजार; मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर

2

नमन धीरच्या कॅचवरुन वाद! केएल राहुल थेट अंपायरशी भिडला, नक्की झाले काय?

3

‘उत्सव बांधिलकी'चा! झी 24 तासची दिवाळी बळीराजाच्या दारी; 'या' ठिकाणी आनंदाचा उत्सव

4

2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल? 2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणारे ग्राहक दर जाणून शॉक

5

सर्वात जास्त बोली लावूनही फ्लॅट मिळाले नाहीत? NBCC च्या लिलावावर प्रश्नचिन्ह; न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शेअर बाजार : दिवाळीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. शेअर बाजार देखील बंद असतो.  मात्र, दर्वर्षी सुट्टी असूनही फक्त 60 मिनिटांसाठी शेअर बाजार उघडतो. यादम्यान शेअर्सची खरेदी-विक्री होते. या विशेष सत्राला 'मुहूर्त ट्रेडिंग' असे म्हणतात. यंदाचा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ जाहीर झाला आहे.  

भारतात दिवाळी सणाला विशेष महत्व आहे. सोनं चांदीच्या खरेदीसह शेअर बाजारात गुंतवणूक करणारे देखील दिवाळीच्या या खास मुहूर्त ट्रेडिंगची वाट पाहत असतात. दिवाळी हा ट्रेंडिंगसाठी शुभ मुहूर्त मानला जातो.  पूजा करण्याची आणि नवीन व्यावसायिक वर्षाचे स्वागत करण्याची ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.

दिवाळीच्या काळात शेअर्स खरेदी करणे ही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची एक परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 5 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार थोड्या काळासाठी खुला राहील. बीएसई आणि एनएसई या दोन्ही एक्सचेंजवर व्यवहार होणार आहेत. या काळात गुंतवणूकदारांना त्यांचे आवडते शेअर्स खरेदी करता येणार आहेत.

शेअर बाजार फक्त एका तासासाठी उघडणार

यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ दुपारची आहे. 8 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन दिवशी दुपारी 2:20 ते 3:30 पर्यंत मुहूर्त ट्रेडिंगची वेळ आहे. दुपारी 2:05 वाजता एक पूर्व-सत्र सुरू होणार आहे. 8 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताच्या व्यापारासाठी एक्सचेंज उघडा राहणार आहे. सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी दिवाळी-बलिप्रतिपदा निमित्त बीएसई आणि एनएसई दोन्ही बंद राहतील. यानंतर24 नोव्हेंबर रोजी प्रकाश गुरुपर्वानिमित्तही एक्सचेंज बंद राहणार आहेत. 

दिवाळीपूर्वीच शेअर बाजारांत तेजी

दिवाळीपूर्वीच शेअर बाजारांत तेजी पहायला मिळाली. 6 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजारांने सलग सातव्या दिवशी मोठी उसळी घेतली होती. निफ्टी 2.01 टक्क्यांनी, म्हणजेच 493.75 अंकांनी वाढून 25,030 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 2.17 टक्क्यांनी, म्हणजेच 1,718 अंकांनी वाढून 81,028 वर बंद झाला. शेअर बाजारात सकारात्माक चित्र असल्याने  'मुहूर्त ट्रेडिंग' साठी गुंतवणूकदारांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळत आहे.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Stock Market
Business News
india