अभिनेत्री सारा अली खानविरोधात ऑल इंडिया मुस्लिम जमातने फतवा काढले आहेत. ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी सारा अली खानला हा फतवा पाठवला आहे. अभिनेत्रीने केदारनाथ मंदिरात आरती केल्यामुळे ऑल इंडिया मुस्लिम जमात नाराज झाली आहे. अभिनेत्री शिवभक्त असून ती अनेक वेळा केदारनाथ आणि भारतातील इतर मंदिरात जातानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्री रविवारी 25 ऑक्टोबरला केदारनाथ मंदिरात दर्शनासाठी गेली होती.
यानंतर इस्लामिक धर्मगुरू मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी सारा अली खानच्या केदारनाथ मंदिरात जाण्यावरू आक्षेप घेतला आहे. मौलवीने या प्रकरणावर म्हटलं की, मुस्लिम धर्मात दुसऱ्या धर्मानुसार उपासना करणे हे शरियतनुसार अनुज्ञेय नाही आणि हराम आहे. सारा अली खानने अल्लाहकडे क्षमा मागावी. ती एक दोषी व्यक्ती आहे. सारा अली खान केदारनाथला गेल्यानंतर मला अनेक तरुणांनी विचारलं केदारनाथमध्ये साराची पूजा करणे शरियानुसार योग्य आहे का. त्यावर मी स्पष्ट केलं आहे की, सारा अली खान कृत्ये निषिद्ध आहेत.
Bareilly: Maulana Issues Fatwa Over Sara Ali Khan’s Kedarnath Visit Maulana Mufti Shahabuddin Razvi has reportedly issued a fatwa over actress Sara Ali Khan’s visit to Kedarnath, describing worship at a temple as contrary to Sharia and terming it “impermissible and haram”. The Maulana has urged Sara Ali Khan to repent. The actress has not issued any public response to the matter so far.
— Atulkrishan (@iAtulKrishan1) October 29, 2026
सारा अली खानच्या केदारनाथ भेटीनंतर आता धार्मिक व्यक्तींकडून टीकेची झोड उठली आहे. अनेक यूजर्सने सोशल मीडियावर सारा अली खानला ट्रोल केलंय. तर मंत्री नितेश राणे म्हणालेत की, हिंदू मंदिरांना भेट देणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत केले पाहिजे. सनातन हिंदू धर्म हा एकमेव धर्म आहे जिथे आम्ही लोकांचे अशा प्रकारे स्वागत करतो. इतर धर्मांमध्ये, कोणालाही केवळ भेट देऊन तिथे उभे राहण्यासाठी अशी परवानगी किंवा तरतूद नाही. हे आमच्या सनातन हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे.
Mumbai, Maharashtra: On actress Sara Ali Khan performing aarti at Kedarnath, Minister Nitesh Rane says, “Anyone who visits Hindu temples should be welcomed. Sanatan Hinduism is the only religion where we welcome people in this way. In other religions, there is no such permission or provision for anyone to simply visit and stand there. This is a unique characteristic of our Sanatan Hindu religion.”
— IANS (@ians_india) October 28, 2026
दरम्यान सारा अली खानच्या मंदिर किंवा धार्मिक स्थळाच्या दर्शनावरून यापूर्वी अनेक वाद झाले आहेत. अभिनेत्रीने केदारनाथशिवाय उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर, वाराणसीमधील काशी विश्वनाथ मंदिर आणि इतर अनेक प्रमुख धार्मिक स्थळ गेली आहे. तिथे अभिनेत्री पूजा अर्चा करतानाही दिसली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यावरून अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत.