SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'... ते काम त्यांच्याकडून करुन घेणं योग्य नाही', केतकी-रोहनच्या आरोपांनंतर लीना भागवत-मंगेश कदम स्पष्टच बोलले, 'तिसऱ्यांदा मानधन...'

अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांनी मानधनाच्या मुद्द्यावर नाटकातून काढून टाकले या आरोपावर निर्मात्यांनी उत्तर दिलं आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 28, 2026, 01:54 PM IST | Updated: Oct 28, 2026, 01:56 PM IST
Image Credit: aamne saamne natak
Join

मानधन वाढवून मागितल्यामुळं आमनेसामने नाटकातून काढन टाकल्याचा आरोप अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांनी केला होता. सोशल मीडियावर त्यांनी कसा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र कलाकारांच्या या आरोपांवर आता नाटकाचे निर्माते आणि कलाकार लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी उत्तर दिलं आहे. अपेक्षित असलेला मोबादला निर्माता म्हणून आम्ही देऊ शकत नाही. ते काम त्यांच्याकडून करुन घेणे योग्य नाही, म्हणून थांबवण्याचा निर्णय घेतला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्यांनी रोहन गुजर आणि केतकी विलास यांच्या आरोपांचे खंडन केलं आहे. तसंच, व्हिडिओला नाण्याची दुसरी बाजू असं कॅप्शन दिलं आहे.

मी लीना भागवत, आमने सामने या नाटकात काम करते. आम्ही दोघेही त्या नाटकाचे निर्मातेही आहोत. आमच्या सहकलाकारांनी, आधीच्या सहकलाकारांनी काल जो व्हिडिओ पोस्ट केला तो आम्ही पाहिला. दिवसभर त्याच्यावरच्या प्रतिक्रियाही पाहिल्या आणि त्यानंतर आता आम्हाला काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात." असं लीना भागवत म्हणाल्या.

"मानधन वाढवून मागितलं, म्हणून तडकाफडकी काढून टाकलं, अशा आशयाचा एकंदर सूर तिथे दिसतो. पण या सगळ्यांत एक शब्द राहून गेलाय आणि तो म्हणजे 'तिसऱ्यांदा मानधन वाढवून मागितलं'. सुरुवातीला जेव्हा आमच्याकडे त्यांच्याकडून मानधन वाढीचा प्रस्ताव आला होता, तो अगदीच मामूली होता. कारण नाटकही तेव्हा चालू नव्हतं. इतकी वर्ष झाल्यानंतर तो करणं हे गरजेचंच होतं. आम्ही हो म्हटलं. त्यानंतर मात्र जेव्हा नाटक चांगलं चालायला लागलं, त्याच्या चार ते पाच महिन्यातच पुन्हा एकदा मानधन वाढीचा प्रस्ताव आमच्याकडे आला." असं लीना भागवत पुढे सांगत होत्या.

 

 

मंगेश कदम यांनी पुढे सांगितलं की, तो जेव्हा प्रस्ताव आला. तेव्हा मीच त्यांच्याशी बोललो. मी त्या दोघांना विचारलं की तुमची काय अपेक्षा काय? तर त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या आणि त्या अपेक्षा आम्ही लगेचच मान्य केल्या.

या संदर्भातील सगळे मेसेजस, त्यांनी जी अमाउंट आम्हाला सांगितली आणि आमच्याकडून जी 'हो' असं सांगण्यात आली आहे. त्या संदर्भातले सगळे मेसेज लिखित स्वरुपात आमच्याकडे उपलब्धही आहेत. त्यानंतर मानधनवाढ झाली. परत एकदा प्रयोग सुरळीत सुरू झाले. मग वर्ष व्हायच्या आधीच कॅनडा दौऱ्यात पुन्हा एकदा आमच्याकडे मानधनवाढीचा प्रस्ताव आला, असं लीना भागवत यांनी म्हटलं आहे.

मंगेश कदम यावर म्हणाले की, "तेव्हा मला जरा धक्का बसला. कारण जेव्हा दुसऱ्यांदा मानधन वाढवलं तेव्हा आम्ही त्यांना विचारलं होतं की आणखी काही तुमच्या अपेक्षा आहेत का? तर त्या दोघांनी सांगितलं की, नाही नाही सर, आम्हाला एवढं मानधन झालं तरी खूप आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये."

लीना भागवत शेवटी म्हणाल्या की, "त्या मानधन वाढीच्या प्रस्तावाबरोबरच असं सांगण्यात आलं की ही मानधन वाढ आम्हाला प्रत्येक वर्षी अपेक्षित आहे. मराठी रंगभूमीवरच्या कुठल्याही निर्मात्याला अशी दरवर्षी एखाद्या नाटकातील कलाकारांची मानधनवाढ करणं हे शक्य होईलच असं नाही, निदान आम्हाला तरी शक्य झालं नाही. म्हणून आम्ही नाही म्हटलं. ज्या गोष्टीचा त्यांना अपेक्षित असलेला मोबदला निर्माता म्हणून आम्ही देऊ शकत नाही, ते काम त्यांच्याकडून करुन घेणं योग्य नाही. म्हणून थांबण्याचा निर्णय घेतला." असं स्पष्टीकरण लीना भागवत यांनी दिलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES