SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'अशा लोकांना काहीही...' नाना पाटेकर यांच्या मुलाने तनुश्री दत्ताला स्पष्टचं सांगितलं! म्हणाला - 'अजूनही त्यावर...'

अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण देशामध्ये शोक व्यक्त करण्यात आला होता, पण यावेळी अभिनेत्री तनुश्री दत्ताने धक्कादायक विधाने केली होती, आता यावर त्यांच्या मुलाने प्रतिक्रिया दिली आहे.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 16, 2026, 04:26 PM IST | Updated: Oct 16, 2026, 04:49 PM IST
Join

सिनेमा सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे 8 ऑक्टोबर रोजी गोव्यात राहत्या घरी निधन झाले, त्याच्या या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर संपूर्ण देशामध्ये शोक व्यक्त करण्यात आला होता, पण यावेळी अभिनेत्री तनुश्री दत्ताने धक्कादायक विधाने केली होती. यावेळी तिने नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेक व्हिडिओ आणि मुलाखतींमध्ये वादग्रस्त विधाने केले होते. यावर अभिनेत्रीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मिडियावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या आता या प्रकरणावर नाना पाटेकर यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांनी या वक्तव्यांवर मौन सोडले आहे.

हिंदुस्तान टाइम्सला नुकतीच एक मुलाखत नाना पाटेकर यांच्या मुलाने दिली आहे यामध्ये त्याने या प्रकरणावर मौन सोडले आहे. नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार याने तनुश्री दत्ताचे नाव न घेता प्रतिक्रिया दिली आहे. मल्हार म्हणाला की, कोणाचेही नाव न घेतला मला एवढेच सांगायचे आहे, लोक मुद्दा विनाकारण उपस्थित करत आहेत, तो आधीच संपला आहे असे त्यांनी सांगितले आहे. न्यायालयाने या प्रकरणावर का कधीच निकाल दिला आहे पण लोक अजूनही त्यावर चर्चा करत आहेत. मला या लोकांना काहीही उत्तर किंवा म्हणायचे नाही आहे देव त्यांचे भले करो, सत्य नेहमीच टिकून राहते असे त्याने सांगितले.

नाना पाटेकर यांचे मल्हारसोबतचे नाते कसे होते?

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर मल्हारने त्याच्या वडिलांसोबतचे नाते त्याने सांगितले आहे. नाना पाटेकर यांच्या मुलाने सांगितले की, त्याचे आपल्या वडिलांशी म्हणजेच नाना पाटेकर यांच्याशी एक विशेष नाते आहे. त्याने असेही सांगितले की, त्याच्या आई-वडिलांनी त्याला कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धैर्य आणि शक्ती दिली. मल्हारने असेही सांगितले की, लोक त्याच्या कुटुंबाबद्दल काय म्हणतात याची त्याला पर्वा नाही. त्याला सर्वांकडून प्रेम मिळाले आहे. त्याचे कुटुंब एकमेकांशी भावनिकरित्या जोडलेले आहे, असे त्याने या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितले आहे.

नाना पाटेकर यांचे निधन झाले आणि काळानंतर तनुश्री दत्ताने लखनऊमधील एका कार्यक्रमामध्ये जात असताना तिच्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये तिने व्हिडिओच्या मार्फत नाना पाटेकर यांचे वर्णन करण्यासाठी 'ईविल डेड' (Evil Dead) हा शब्दप्रयोग वापरला. या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मिडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती, त्यानंतरही ती थांबली नाही आणि तिने सातत्याने अनेक व्हिडिओ शेअऱ करुन अनेक वादग्रस्त विधाने केली. तिने व्हिडिओमध्ये असेही म्हटले की, तिच्यासाठी त्यांचा मृत्यू एका चमत्कारापेक्षा कमी नव्हता.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES