SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'तुम्ही 2 जणांना मारले, तर 70 हजार नेमबाज आहेत...', अनिल पंडितचा नवा ऑडिओ! म्हणाला 'सुशांतसिंह राजपूतच्या'

टायगर श्रॉफवरील हल्ल्यामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता अनिल पंडितने दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे यामध्ये त्याने धक्कादायक विधाने केली आहेत.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 19, 2026, 06:01 PM IST | Updated: Oct 19, 2026, 06:12 PM IST
Join

बॅालिवूडचा अभिनेता टायगर श्रॅाफ यांच्यावर जुहूमध्ये अचानक गोळीबार झाला आणि त्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. टायगर श्रॉफवरील हल्ल्यामुळे लॉरेन्स बिश्नोई टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान, परदेशात राहणाऱ्या अनिल पंडित नावाच्या एका गुंडाने एक नवीन ऑडिओ प्रसिद्ध केला आहे. या ऑडिओमध्ये अनिल पंडित प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दाऊदचे नावही घेत आहे. त्याने पहिली एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली होती त्यानंतर त्याने यामध्ये सलमान खानसोबत काम करणाऱ्या कलाकारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता अनिल पंडितने दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे यामध्ये त्याने धक्कादायक विधाने केली आहेत.

व्हायरल झालेल्या नवीन ऑडिओ क्लिप नक्की काय म्हणाला अनिल पंडित?

ऑडिओ क्लिपच्या सुरुवातीलाच अनिल पंडित यांनी स्वत: ला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ म्हणून वर्णन केले आहे. पहिल्या ऑडिओ क्लिपमध्ये धमकी देण्यात आली होती, त्याचबरोबर जो सलमान खानसोबत काम करेल त्याला जीवे मारणार अशी धमकी देखील दिली. अनिल पंडित यांनी नवीन ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या वेळी हे बॉलिवूड लोक कुठे होते? ते म्हणाले की, जेव्हा आमचे मोठे बंधू लॉरेन्स बिश्नोई यांनी त्यांच्यावर कारवाई केली, तेव्हा प्रशासन आमच्या विरोधात उभे आहे. पण सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या वेळी सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.

हे ही वाचा

टायगर श्रॉफवर 5 राऊंड फायरिंग! हल्ल्याची जबाबदारी घेणारा लॉरेन्स बिश्नोई कोण?

पुढे या ऑडिओ क्लिपमध्ये अनिल पंडित म्हणाला की, ही लढाई देशाच्या गद्दारांविरोधात आहे आणि ती सुरूच राहील, असा दावा ऑडिओमध्ये करण्यात आला आहे. अनिल पंडित म्हणाले की, मुंबईत त्यांचे 200 नेमबाज आहेत आणि विविध भागात एकूण 70,000 हून अधिक नेमबाज आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल देखील ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख केला होता. ऑडिओमध्ये अनिल पंडित पुढे म्हणतात की, आपल्या देशातील जे राजकारणी पाकिस्तान आणि दुबईमध्ये बसून दाऊदच्या पैशाने चित्रपट बनवतात आणि त्याला दुप्पट पैसे देतात, त्यांचा वापर आपल्याच देशाविरुद्ध केला जात आहे. त्याने ड्रग्जचा व्यापार केला, स्फोट घडवून आणले, पण प्रशासनाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. 

पुढे म्हंटले आहे की, आज, जेव्हा आम्ही त्याच्यावर कारवाई केली, तेव्हा प्रशासन आमच्या मागे लागले. बाकी सर्व ठीक आहे; आम्ही आमची घरे आणि कुटुंबे सोडून आलो आहोत. आणि सलमान खानबद्दल बोलायचं झालं तर, जोपर्यंत तो माफी मागत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला जाऊ देणार नाही. आम्ही त्याचे आयुष्य कठीण करून टाकू.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES