इंटीमेट सीन करण्याआधी या अभिनेत्रीला डायरेक्टरने पाजली दारु! अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा
अभिनेत्री नायरा बॅनर्जीने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एक धक्कादायक मुलाखतीमध्ये तिने एक शूटींगच्या किस्स्याबद्दल सांगितले आहे.
अभिनेत्री अनेकदा त्यांचा कास्टिंग काऊचचे किस्से मुलाखतींमध्ये सांगतात, आता एका अभिनेत्रीने कास्टिंग काऊचचा किस्सा नाही तर अभिनेत्रीसोबत घडलेला शूटींगच्या वेळचा किस्सा सांगितला आहे. अभिनेत्री नायरा बॅनर्जीने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एक धक्कादायक मुलाखतीमध्ये तिने एक शूटींगच्या किस्स्याबद्दल सांगितले आहे. नायरा बॅनर्जी ही टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात बोल्ड सौंदर्यवतींपैकी एक आहे. तिने अनेक रिअॅलिटी शो देखील केले आहेत. आता अभिनेत्रीने शूटींगच्या वेळी इंटीमेट सीन करण्यासाठी चक्क डायरेक्टरने अभिनेत्रीला दारु पाजली होती असा खुलासा केला आहे. नक्की प्रकरण काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
गलटा इंडिया एका नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये नायरा बॅनर्जीने शूटींग दरम्यान झालेली घटना तिने सांगितली आहे. नायरा बॅनर्जी ही अभिनेत्री छोट्या पडद्याव्यतिरिक्त, ती व्हर्टिकल्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काम करते, अनेक रिअॅलिटी शोमध्ये देखील मागील काही काळामध्ये अभिनेत्री दिसली आहे. गलटा इंडियासोबतच्या मुलाखतीमध्ये नायराने बोल्ड आणि इंटिमेट दृश्यांच्या चित्रीकरणाबद्दल सांगितले. तिने सेटवर होणाऱ्या तयारीबद्दल सविस्तर माहिती दिली. नायरा म्हणाली, "प्रोडक्शनवाले एक ट्रे आणून खोलीत अगोदरच पाठवतात. त्यात च्युइंग गम, परफ्यूम आणि सॅनिटायझर असतं. प्रोडक्शनवाले सगळं काही अगोदरच कलाकारांना पुरवले जाते असे अभिनेत्रीने सांगितले."
हे ही वाचा
पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video
अभिनेत्रीने तिच्या पहिल्या सिनेमाचा किस्सा सांगितला. याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की, ज्यात जिव्हाळ्याच्या दृश्यांना घाबरल्यामुळे ती सेटवरून पळून गेली होती असे म्हटले जाते. त्यावेळी ती एका गंभीर नात्यात होती असेही अभिनेत्रीने सांगितले. तिच्या सहकलाकारासोबत तिचे भावासारखे नाते होते, त्यामुळेच तिला अस्वस्थ वाटत होते. त्याकाळी इंटिमसी कोऑर्डिनेटर नव्हते, दिग्दर्शकच दृश्यांचे वर्णन करायचा. आम्ही अनेक कार्यशाळा घ्यायचो, आम्ही भावनिक जवळीक निर्माण करायचो. पण जेव्हा शारीरिक जवळीकीचा विषय आला, तेव्हा परिस्थिती बिघडली. मी रडायला लागले. मी सेटवरून पळून गेले. मी म्हणाले, 'आई, माझा बॉयफ्रेंड मला मारणार आहे.'
मग दिग्दर्शकाने मला वोडकाचे शॉट्स देऊ केले. तेव्हाच मी ते केले. शूटिंगच्या दिवशी मी माझ्या बॉयफ्रेंडला 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' असा मेसेज केला. जेव्हा माझ्या बॉयफ्रेंडला कळलं की मी चुंबन दृश्यं केली आहेत, तेव्हा तो थोडा रागावला. त्याने माझ्या आईकडे तक्रार केली. पण माझ्या आईने त्याला रागावले. तिने समजावून सांगितले की या व्यवसायात हे सामान्य आहे. त्याला मला समजून घ्यावेच लागेल. नायराने सांगितले की, तिने तिच्या प्रियकरासाठी असे अनेक धाडसी प्रकल्प नाकारले होते. पण ती ते नेहमीच नाकारू शकली नाही.