SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रणबीर कपूरचा 'रामायण' सिनेमा तब्बल 40 भाषांमध्ये होणार रिलीज

Ramayan Movie : नितेश तिवारी दिग्दर्शित आणि मोठी स्टारकास्ट लाभलेला रामायण हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून तो तब्बल 40 भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 12, 2026, 03:13 PM IST | Updated: Oct 12, 2026, 03:39 PM IST
Join

Ramayan Movie : अभिनेता रणबीर कपूरच्या 'रामायण' भाग 1 रिलीज होण्यासाठी आता केवळ 1 महिन्याभराचा अवधी शिल्लक आहे. चित्रपट दिवाळीच्या दरम्यान जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांना अनेक काळापासून प्रतीक्षा आहे. चित्रपटाचा ट्रेलर, टीझर आणि विविध पोस्टर्समुळे या चित्रपटाची चर्चा आता एका वेगळ्याच उंचीवर पोहोचली आहे. निर्माते भारताच्या सीमांच्या पलीकडे जाऊन जगभरात या चित्रपटाचे भव्य स्तरावर प्रदर्शन करण्याचे नियोजन करत आहेत. म्हणूनच हा चित्रपट सुमारे 40 भाषांमधील डब केलेल्या आवृत्त्यांसह प्रदर्शित करण्याबाबत चर्चा सुरू आहे.

मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करण्याचं नियोजन :

मीडिया रिपोर्ट्सनुसार या रामायण चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा आणि त्यांची टीम रामायण चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रदर्शित करू इच्छिते. या चित्रपटाला भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट म्हणून जागतिक स्तरावर सादर करावे, अशी निर्मात्यांची इच्छा आहे. या उद्दिष्टासाठी ही टीम बऱ्याच काळापासून प्रयत्नशील आहे. सिनेमाकॉन 2026 आणि 'सॅन दिएगो कॉमिक कॉन'  येथे या चित्रपटाचा प्रचार करण्यामागेही हेच कारण होते. आंतरराष्ट्रीय वितरणासाठी 'सोनी पिक्चर्स'ची निवड करणे हा देखील या योजनेचाच एक भाग असल्याचे सूत्राने सांगितलं आहे.

इतक्या भाषेत प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा :

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामायण हा चित्रपट जगातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना मंत्रमुग्ध करण्याचा अनुभव द्यावा यासाठी ‘रामायण’चे सुमारे 40  भाषांमध्ये डबिंग करण्यात आले आहे. सबटायटल्सवर अवलंबून राहण्याऐवजी, प्रेक्षक हा चित्रपट त्यांना समजणाऱ्या भाषेत पाहू शकतील, हा या मागचा उद्देश आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार एखाद्या भारतीय चित्रपटाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर डबिंग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा चित्रपट ज्या भाषांमध्ये डब करण्यात आला आहे, त्यांची संपूर्ण यादी एक-दोन आठवड्यांत जाहीर केली जाईल.

कोण कोण दिसणार या चित्रपटात?

रामायण हा चित्रपट दोन भागांत तयार केला जात आहे. पहिला भाग 5 नोव्हेंबरला प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग पुढील वर्षी दिवाळीच्या काळात प्रदर्शित होणार आहे. यात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या, साई पल्लवी सीतेच्या, सनी देओल हनुमानाच्या, यश रावणाच्या, रवी दुबे लक्ष्मणाच्या आणि अरुण गोविल राजा दशरथाच्या भूमिकेत दिसतील. या मुख्य पात्रांवव्यतिरिक्त, बॉलीवूडचे अनेक बडे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून, संगीत ए.आर. रहमान आणि हॅन्स झिमर यांनी दिले आहे. चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग 20 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES