SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

Exclusive : 'टीकाकारांनो...'; ट्रोलर्सना सचिन पिळगावकरांचं सडेतोड उत्तर, 'ती महाराष्ट्राची पोरं असतील...'

अभिनेते सचिन पिळगावकर यांना सोशल मीडियावर अनेक वेळा ट्रोल करण्यात येतं. झी 24 तासच्या टू द पॉईंट विथ कमलेश सूतार या विशेष मुलाखतीतून त्यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 17, 2026, 08:07 PM IST | Updated: Oct 18, 2026, 06:26 PM IST
Image Credit: Sachin Pilgaonkar To the Point with Kamlesh Sutar
Join

मराठी कलाविश्व असो किंवा बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर हे वयाच्या 68 व्या वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. सचिन पिळगावकर हे सोशल मीडियावरही सक्रीय असता. ते सोशल मीडियावर कायम ट्रोल होत असतात. अशातच  टू द पॉईंट विथ कमलेश सूतार' या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांची खास मुलाखत झालीय. या मुलाखतीत त्यांनी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय.

 

ट्रोलिंगवर काय म्हणाले सचिन पिळगांवकर?

टू द पॉईंट विथ कमलेश सूतार या मुलाखतीदरम्यान सचिन यांना ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना  सचिन पिळगांवकर म्हणाले की, मला ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी वेळ नाहीय. मला काम करण्यात रस अधिक आहे. त्यामुळे ट्रोलर्सना उत्तर देण्यात वेळ का वाया घालवू? त्या बदल्यात मी असं काही काम केलं ज्याच्यामुळे मला आनंद मिळेल. चला काम राहिलं बाजूला, माझ्या परिवारासोबत राहिलो. सुप्रिया आणि श्रेयाला परदेशात फिरायला घेऊन गेलो, या वेळत मला जास्त समाधान मिळेल. ट्रोलर्सना उत्तर देण्यात वेळ वाया घालवणार नाही

.

 

सचिन पिळगावकर पुढे म्हणाले की, सोशल मीडियावर असे कमेंट्स येऊ नये म्हणून एक बटण पण असतं, ज्यामुळे तुम्ही कमेंट्स बंद करू शकता. सोशल मीडिया मी सांभाळत नाही, त्यासाठी माझ्याकडे एक टीम आहे. मी या टीमला एकदम सक्त ताकीद दिली आहे, सोशल मीडियावरील कमेंट्स सेक्शन मधील ते बटण ऑन करायचं नाही. ते बटण ऑन केलं तर कमेंट्स बंद होतात. मी सांगून ठेवलं आहे ते बंद करायचं नाही. त्यांना बोलावसं वाटतं प्लीज बोलू द्या. ही आपल्या महाराष्ट्राची पोरं आहेत. जर ती महाराष्ट्राची पोरं असतील म्हणजे ती माझी पोरं आहेत. या महाराष्ट्राने मला भरपूर काही दिलं आहे. त्याची परतफेड मी करु शकत नाही. अशाप्रकारचे ट्रोलिंग झालं तरीसुद्धा प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मग मी त्यांच्या विचार करायचा की यांचा विचार करायचा. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES