'इतकी इज्जत तर...', सलमान खानने सगळ्यांसमोरच फटकारले, काय घडलं नेमकं?
टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर सलमान खान पहिल्यांदा एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.
टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयफा 2027च्या पत्रकार परिषदेत केलेल्या एका वक्तव्याची चर्चा आहे. अभिनेत्याने पापाराझीला उद्देशून एक वक्तव्य केलं आहे. सलमान खानने यापूर्वी अभिनेत्रींचे पाठीमागून फोटो काढणाऱ्या पापाराझींना फटकारले होते. आता, आयफाच्या मंचावर त्याने केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
27 ऑक्टोबर रोजी मुंबईत आयफा 2027 ची प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात सलमान खान व्यतिरिक्त करीना कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन आणि पंकज त्रिपाठी सह अनेक कलाकार पोहोचले होते. सलमान खानने जेव्हा कार्यक्रमात एन्ट्री घेतली तेव्हा त्याने पापराझीला उद्देशून म्हटलं होतं की, 'मित्रांनो या आधी सांगितलेले लक्षात आहे ना? तुम्ही सगळेजण मला इतका आदर तर देऊ शकता.
दरम्यान, याआधीही सलमान खानने हा मुद्दा उपस्थित केला होता. कलाकारांचे पाठीमागून फोटो काढणाऱ्या ट्रोलर्स व पापाराझीवर सलमान खानने नाराजी व्यक्त केली होती. त्याने यावर प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. तसंच, अभिनेत्रींना याविरोधात आवाज उठवण्याचा सल्ला दिला. आयफा 2027 कार्यक्रमातील सलमानच्या वक्तव्यांना याच मुद्द्याशी जोडले जात आहे. सलमानने त्याच्या स्टाईलने पापाराझीला आठवण करुन दिली की त्यांनी इतरांच्या गोपनीयतेचा आणि आदराचा सन्मान केला पाहिजे.
आयफा 2027 केव्हा आणि कुठे होणार?
सलमान खान आणि शाहिद कपूर यांनी आयफा 2027 पत्रकार परिषदेत जाहिर केलं की, 2027 चा आयफा पुरस्कार सोहळा 23-24 जानेवारी 2027 रोजी अबू धाबीमधील यास आयलंडवर आयोजित केला जाईल.
दरम्यान, टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर धक्कादायक खुलासा समोर येत आहे. टायगर श्रॉफवरील गोळीबाराआधी आरोपींकडून सलमान खानच्या घराची रेकी करण्यात आली होती. तर, हल्लेखोरांच्या मेन टार्गेटवर सलमान खानच होता, अशीही माहिती समोर यत आहे. त्यानंतर सलमानच्या घराची सुरक्षाव्यवस्थेत बदल करण्यात आला. सलमान खानच्या घरी सशस्त्र कमांडो तैनात करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सलमान खानच्या घरावर यापूर्वीही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या होत्या त्या आता अपग्रेड करण्यात येत आहेत.