Samantha Ruth Prabhu Baby Boy : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने काही दिवसांपूर्वीच तिच्या कुटुंबासोबत एक खास कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते. आता तिने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि तिचा पती राज निदिमोरू एक मुलाला जन्म दिला आहे. अभिनेत्रीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि तिचा पती राज निदिमोरू यांच्या घरी लहान राजकुमाराचा फोटोही एक शेअर केला आहे आणि त्याचे नाव देव निदिमोरू असल्याचे देखील पोस्टमध्ये अभिनेत्रीने सांगितले आहे.
सामंथाने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका बाळाचा हात दिसत आहे. बाळाने वडिलांचा हात धरला आहे आणि आईनेही बाळाचा हात धरला आहे. फोटोसोबत सामंथाने लिहिले आहे, "आमचा गोड बाळ मुलगा. देव निदिमोरू. 19.11.2026. आमची मनं याआधी कधीही इतकी आनंदी नव्हत." तमन्ना भाटियाने सामंथा रुथ प्रभूच्या पोस्टवर हार्ट इमोजीसह आपला आनंद व्यक्त केला. वरुण धवननेही अभिनेत्रीचे अभिनंदन केले. सामंथाच्या एका फॅन क्लब पेजने लिहिले, "तुमचा छोटा राजकुमार आला आहे आणि प्रेमाचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. अभिनंदन सॅम आणि राज."