संजय गुप्ता यांच्या अंत्यसंस्कारावेळी लेकीचे कॅमेऱ्यासमोर अश्लिल हावभाव! VIDEO व्हायरल
संजय गुप्ता यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संजय गुप्ता यांची मुलगी मिडीयासमोर अश्लिल हावभाव करताना दिसत आहे, जो चर्चेचा विषय बनला आहे.
चित्रपट निर्माते संजय गुप्ता यांच्या निधनाचा सर्वांनाच धक्का बसला, संजय गुप्ता यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनानंतर, अनेक सेलिब्रिटींनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अंत्यविधीला हजेरी लावली. घरात बाथरूममध्ये पाय घसरून त्यांचा मृत्यू झाला, ते फक्त 57 वर्षांचे होते. संजय गुप्ता यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. संजय गुप्ता यांची मुलगी मिडीयासमोर अश्लिल हावभाव करताना दिसत आहे, जो चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात या कृत्यावर टीका केली जात आहे, नक्की प्रकरण काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
संजय गुप्ता यांची मुलगी गाडीत बसलेली असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी गाडीला पापाराझींनी घेरलेले दिसत आहे, यावेळी ती तिच्या बाबांचे निधन होऊनही हसताना दिसत आहे, एवढेच नाही तर व्हिडिओमध्ये, संजयची मुलगी निघून जाताना पापाराझींच्या दिशेने अश्लील हावभाव करताना दिसत आहे. चित्रपट निर्मात्याची मुलगी दलाई गुप्ता ही व्हिडिओमध्ये ती हसताना आणि त्यांना मधले बोट दाखवताना दिसली. तथापि, त्यावेळी तिने आपला चेहरा लपवल्यामुळे, ती खरोखरच संजय गुप्ता यांची मुलगी होती की नाही याची पुष्टी होऊ शकलेली नाही, सध्या हा व्हिडिओ सोशल मिडिया वेगाने व्हायरल होत आहे.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संजय गुप्ता निधनानंतर एक तरुणी पुढच्या सीटवर बसलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ही तरुणी सुरुवातीला तिचे तोंड हुडीने लपवताना दिसत आहे आणि जेव्हा गाडी पापाराझींनी घेरली होती यावेळी तिने पापाराझींना कॅमेऱ्यासमोर मधले बोट दाखवले. ड्रायव्हर तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण ती पुढे जातच राहते. गाडी चालवणारी एक व्यक्तीसुद्धा तिला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसते.
हे ही वाचा
'ही विठाबाईंची कथा नाही...' 'ईठा'वरून रंगलेल्या वादावर दिग्दर्शकाचं स्पष्टीकरण
सोशल मिडियावर हा व्हिडिओ 24 तासांमध्ये व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया यावर होत आहे. या व्हिडिओवर संजय गुप्ता यांच्या मुलीवर जोरदार सोशल मिडियावर टीका होत आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, संजय गुप्ता यांचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. ते वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. प्राथमिक माहितीनुसार, घरात त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला.