SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मृत्यूनंतरही समाजकार्य! नाना पाटेकरांची एक इच्छा अपूर्ण राहिल्याने आता थेट काश्मीरमध्ये त्यांच्या नावाने...

नाना पाटेकर यांचं 8 ऑक्टोबर रोजी गोव्यामध्ये राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या एका अपूर्ण इच्छेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या नावाने थेट जम्मू-काश्मीरमध्ये शाळा सुरु केली जाणार आहे. याबद्दलच जाणून घेऊयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 10, 2026, 02:22 PM IST | Updated: Oct 10, 2026, 02:33 PM IST
Image Credit: 8 ऑक्टोबर रोजी नानांचं निधन झालं (फोटो फेसबुकरुन साभार)
Join

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या निधनानंतर त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. नानांना कृतिशील श्रद्धांजली वाहण्यासाठी सरहद संस्थेतर्फे काश्मीरमध्ये नानांच्या नावाने शाळा सुरू करण्याचा संकल्प केला आहे. सरहदचे समन्वयक जाहीद भट व सलीम रैना यांनी काश्मीरमध्ये नाना पाटेकर यांच्या नावाने शाळा सुरू करण्यासाठी स्वमालकीची जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे 'नाम फाऊंडेशन'चं काश्मीरमध्ये बरंच काम आहे. नानांची एक इच्छा अपूर्ण राहिल्याने अनोख्या पद्धतीने  त्यांच्या नावे शाळा सुरू त्यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.

नानांची कोणती इच्छा अपूर्ण राहिली

सरहद संस्था अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये काम करीत आहे. संस्थेतर्फे कुपवाडा जिल्ह्यातील दर्दपोरा आणि बांदिपोरा जिल्ह्यातील आरागाम येथे शाळा चालवली जाते. नाना पाटेकर यांचे काश्मीरवर विशेष प्रेम होते. काश्मीरमधील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काम करण्याचा मानस व्यक्त केला होता. नाना आणि त्यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी 'सरहद'चे मयूर मसूरकर आणि राजू फरांदे यांची चर्चाही झाली होती. मात्र, नानांच्या अकाली निधनानंतर आता त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले जाणार आहे. 'मल्हार पाटेकर आणि कुटुंबीयांनी मान्यता दिल्यास नाना पाटेकर यांच्या नावाने काश्मीरमध्ये शाळा सुरू करण्यात येईल,' असे मसूरकर आणि फरांदे यांनी सांगितले.

'नाम'चं जम्मू-काश्मीरमधील काम

'नाम फाउंडेशन'चे काश्मीरमधील काम मुख्यत शिक्षण, शाळांच्या सुधारणा आणि कौशल्य विकासावर केंद्रित आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी 2015 मध्ये स्थापन केलेल्या 'नाम' प्रामुख्याने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी काम करते, पण जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेसोबत काही विशिष्ट उपक्रम 'नाम'च्या माध्यमातून राबवले जातात.

नियंत्रण रेषेजवळ (एलओसी), उत्तर काश्मीरच्या बोनियार/उरी भागातील गग्गर हिल प्राइमरी स्कूलचे नूतनीकरण 'नाम फाउंडेशन'ने भारतीय सेनेच्या सहकार्याने केले. भारतीय लष्करामधील चिनार कॉर्प्स, डॅगर डिव्हिजन, पीर पंजाल ब्रिगेडच्या तुकडीने यासाठी मदत केली.  शाळेच्या भिंती रंगवण्यात आल्या असून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅग, शूज, उबदार मोजे, वर्दी आणि स्टेशनरी वितरित करण्यात आलेलं. चोटाली आणि कुराली या जवळच्या शाळांच्या विद्यार्थ्यांनाही साहित्य दिले गेले. बोनियारमधील चिनार नौजवान क्लब / जवान क्लबला हॉस्पिटॅलिटी, बेकरी, आयटी आणि टेलरिंग कोर्सेससाठी साहित्य 'नाम'च्या माध्यमातून देण्यात आले. स्थानिक युवकांना आणि महिलांना शिवण मशीन, एम्ब्रॉयडरी साहित्य इत्यादी देऊन स्वयंरोजगाराला प्रोत्साहन दिले. रिमोट आणि एलओसीजवळच्या गावांतील विद्यार्थी व कुटुंबांना स्वावलंबी करण्यावर भर देण्यात आला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES