SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मुंबई, आज रात्री माझ्या मनाचा...', गायिका शिल्पा रावला गाणं गाताना मधेच रोखलं; शो सुरु असतानाच माईक केला बंद

मुंबईत आयोजित 'बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट'च्या 10 व्या वर्धापन दिन सोहळ्यात, कार्यक्रमाच्या वेळापत्रकात विलंब झाल्यामुळे आयोजकांनी गायिका शिल्पा राव हिचा मायक्रोफोन बंद केला. परिणामी तिला आपला परफॉर्मन्स थांबवावा लागला.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 25, 2026, 07:26 AM IST | Updated: Oct 25, 2026, 07:31 AM IST
Image Credit: गायिका शिल्पा रावला गाणं गाताना मधेच रोखलं
Join

गायिका शिल्पा रावला मुंबईतील आयोजित कार्यक्रमात मध्यातच आपला परफॉर्मन्स थांबवावा लागला. याचं कारण आयोजकांनी गाणं गात असतानाच तिचा माईक बंद करुन टाकला. मुंबईत आयोजित 'बॉलिवूड म्युझिक प्रोजेक्ट'च्या 10 व्या वर्धापन दिन सोहळ्यात हा प्रकार घडला. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेत विलंब झाल्यामुळे तो अचानक थांबवण्यात आला. या प्रकारामुळे शिल्पा राव नाराज झाली असून, तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहते. आज माझ्या मनाचा एक भाग दुखावला असल्याचं तिने म्हटलं आहे.

झालं असं की, कार्यक्रमाची वेळ संपल्याने सुरू असतानाच शिल्पा रावचा मायक्रोफोन आणि इलेक्ट्रॉनिक ऑडिओ डिव्हाइस बंद करण्यात आली. दरम्यान शिल्पा राव प्रेक्षकांचे आभार मानून निरोप घेण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्याच कार्यक्रमातील दुसरे कलाकार कुटले खान यांनी आपला परफॉर्मन्स सुरु केला. ज्यामुळे शिल्पा रावचे समारोपाचे बोलही पूर्ण होऊ शकले नाहीत.

या प्रकारानंतर, शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्टेटमेंट शेअर केले आहे. यामध्ये तिने आपली निराशा व्यक्त केली आणि त्याच वेळी मुंबईतील प्रेक्षकांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. तिने लिहिले, "मुंबई, आज रात्री माझ्या मनाचा एक छोटासा भाग दुखावला गेला आहे. इतकी सुंदर गोष्ट अशा प्रकारे हिरावून घेतली जाणे, हे मनाला खूप वेदना देणारे आहे." ती पुढे म्हणाली, "पण संगीत थांबले तरी, तुम्ही थांबला नाहीत. ज्या पद्धतीने तुम्ही माझे नाव पुकारत होतात, तुमच्या आवाजातील तो प्रेमळ भाव... आज रात्रीची आपली गोष्ट अपूर्ण राहिली. मी वचन देते, मी नक्की परत येईन."

यानंतर सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त होत आहेत. कार्यक्रमात उपस्थित असलेले लोक आणि चाहत्यांनी गैरव्यवस्थापनाबद्दल तसेच एका ज्येष्ठ कलाकाराचा अनादर केल्याबद्दल आयोजकांवर जोरदार टीका केली. कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांनी  कार्यक्रम जवळपास 45 मिनिटे उशिरा सुरू झाला होता, ज्यामुळे कलाकारांच्या सादरीकरणाचा वेळ कमी झाला असे निदर्शनास आणून दिले. "#JusticeForShilpaRao" सारखे हॅशटॅग विविध प्लॅटफॉर्मवर वेगाने ट्रेंड होऊ लागले.

एका युजरने एक्सवर पोस्ट केली की, "#BollywoodMusicProject मध्ये शिल्पा रावसोबत जे घडले, ते अत्यंत धक्कादायक आहे. तिला 'धन्यवाद' म्हणण्यासाठीही वेळ दिला गेला नाही. तिचे सादरीकरण मध्येच थांबवण्यात आले आणि सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करण्यात आली."

दुसऱ्या एका य़ुजरने सर्वात वाईट व्यवस्थापन असल्याची टीका करताना म्हटलं, "कुटले खान यांच्या सादरीकरणादरम्यान शिल्पाच्या सादरीकरणात अचानक व्यत्यय आणला गेला आणि आयोजकांनी तिचे माईक बंद केले. अत्यंत निकृष्ट दर्जाचे नियोजन! अशी गोष्ट कोणत्याही कलाकारासोबत घडू नये." इन्स्टाग्रामवरही अनेकांनी अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या; 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES