SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बॅकफूटवर आले मंत्री सुबोध उनियाल! दलेर मेहंदी यांची अखेर मागितली माफी, मिका सिंग म्हणाला, 'जर आदर...'

उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांनी फोनवरून गायक दलेर मेहंदी यांची माफी मागितली आहे. याआधी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही त्यांची माफी मागितली होती.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 26, 2026, 08:17 AM IST | Updated: Oct 26, 2026, 08:22 AM IST
Image Credit: सुबोध उनियाल यांनी गायक दलेर मेहंदी यांची मागितली माफी
Join

उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांनी गायक दलेर मेहंदी यांची अखेर माफी मागितली आहे. कुंजापुरी देवी जत्रेत घडलेल्या वादाप्रकरणी त्यांनी फोनवरुन दिलगिरी व्यक्त केली आहे. याआधी, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही मेहंदी बंधूंशी संवाद साधून, उनियाल यांच्या वतीने माफी मागितली होती. दलेर मेहंदीचा भाऊ मिका सिंगने पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. सुबोध उनियाल यांच्या माफीनंतर, गायक मिका सिंगच्या टीमने एक निवेदन जारी करून मंत्र्यांच्या या कृतीचे स्वागत केले आहे. कलाकारांचा आणि त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे असं त्यांनी अधोरेखित केलं आहे.

निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, "आम्ही सुबोध उनियालजी यांचे आभारी आहोत की त्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दलेर मेहंदी पाजी यांची दूरध्वनीवरून माफी मागितली. कलाकारांचा आणि त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे आवश्यक आहे. दलेर 'पाजी' हे एक ज्येष्ठ कलाकार आहेत, ज्यांनी संगीत क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक कलाकार आदरास पात्र असतो. आम्हाला आशा आहे की, हा विषय इथेच संपेल आणि सर्वजण परस्पर आदर व समजुतीने पुढे जातील. टीम मिका सिंग".

या माफीनाम्यानंतर, दलेर मेहंदी आणि मंत्री सुबोध उनियाल यांच्यातील वाद आता शमेल अशी अपेक्षा आहे. मात्र, याआधी एका पत्रकार परिषदेत मंत्र्यांनी आपल्या आधीच्या विधानाचे समर्थन केले होते. त्यांनी असा दावा केला की, जर कलाकार आजारी होता, तर त्याने आयोजकांना किंवा प्रेक्षकांना आधीच कल्पना द्यायला हवी होती.

 

 

नेमके प्रकरण काय होते?

18 ऑक्टोबर रोजी, नवरात्रीदरम्यान, टिहरी गढवाल येथील कुंजापुरी देवी जत्रेत दलेर मेहंदी यांचा लाईव्ह परफॉर्मन्स सुरू होता. त्यावेळी मंत्री सुबोध उनियाल मंचावर आले आणि त्यांनी हा कार्यक्रम थांबवला. त्यांनी असा आरोप केला की, दलेर मेहंदी नशेत होते आणि ते केवळ 'लिप-सिंकिंग' करत होते.

या घटनेनंतर, गायक मीका सिंगने मंत्र्यांची जाहीर माफी मागितली. मिकाने स्पष्ट केले की, त्यांचे भाऊ कधीही मद्यपान करत नाहीत आणि त्यावेळी त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांनी असा प्रश्नही उपस्थित केला की, एका ज्येष्ठ कलाकाराशी सार्वजनिक मंचावर अशा प्रकारे कसे वागले जाऊ शकते? दरम्यान, दलेर मेहंदी यांनी स्वतः मात्र या वादावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES