SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

4 हॉटेल्स, रेकी अन्...टायगर श्रॉफ फायरिंग प्रकरणात कोर्टात धक्कादायक खुलासे, आरोपी बबीताला अश्रू अनावर, अनिल पंडितबद्दल मोठी अपडेट

टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या आरोपींबाबत नवीन माहिती समोर आलीये. तर अनिल पंडितबद्दलही मोठी अपडेट आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 22, 2026, 11:08 PM IST | Updated: Oct 22, 2026, 11:10 PM IST
Image Credit: tiger shroff firing case
Join

टायगर श्रॉफवर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी मुंबईतील आरे कॉलनीच्या जंगलात गोळीबाराचा सराव केला होता. एका आरोपीने पिस्तुलाची योग्य कार्यप्रणाली तपासण्यासाठी सराव म्हणून दोन गोळ्या झाडल्या, तर दुसऱ्याने एक गोळी झाडली. त्याचबरोबर दोन्ही आरोपी मुंबईतील अंधेरी इथल्या एका हॉटेलमध्ये थांबले असताना, पिस्तुलाची चाचणी करताना एक गोळी सुटली आणि ती हॉटेलच्या खोलीतील पलंगाला लागली. त्याचबरोबर आरोपी संशय येऊ नये म्हणून सतत ठिकाणं बदलत होते. आरोपींनी अंधेरी आणि आजूबाजूच्या परिसरातील चार हॉटेलमध्ये राहिले होते. मात्र, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना याची काहीच कल्पना नव्हती. दरम्यान, गोळीबार करण्यापूर्वीच आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज झी २४तासच्या हाती लागलंय. या दृश्यांमध्ये एक आरोपी पिस्तुलांनी भरलेली निळ्या रंगाची बॅग घेऊन हॉटेलमधून बाहेर जाताना दिसतोय..याच पिस्तुलांतून आरोपींनी टायगर श्रॉफवर गोळीबार केला होता.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अपडेट - मुंबईत ४ वेगवेगळ्या हॉटेलात आरोपी थांबले!

- कुणालाही शंका येऊ नये, आपल्या हालचाली संशयास्पद वाटू नये म्हणून आरोपी सतत बदलायचे हॉटेल

- अंधेरी आणि आजूबाजूच्या परिसरात घेतले होते हॉटेल, जेणेकरून रेकी करणे जाणार सोपे..

- आज क्राइम ब्रांच ४ ही हॉटेलमध्ये सर्च ऑपरेशन राबवणार..

आरोपी बबीताला कोर्टात अश्रू अनावर

आरोपीनी हल्यात वापरण्यात आलेली वेपन मिळवून दिले आहेत

कुणाल आणि सुमितने सगळी व्यवस्था केली होती तसेच राधा आणि बबिता मुंबईत  पोहोचवले

कोणाच्या सांगण्यावरून वेपन पुरवले याची चौकशी करायची असल्याचे पोलिसानी पोलिस कोठडी मागितली

मोबाईल जप्त करायचे आहेत तसेच अधिक तपास याबाबत करायचा आहे

९ दिवस आरोपींची पोलीस कोठडी देण्याची मागणी

आरोपीचे वकील

संशयाच्या आधारावर अटक करण्यात आली आहे

आरोपींना पिस्तुल कोणत्या कंपनीचे आहे हे सुद्धा ओळखता येत नाही आहे

काही ठोस माहिती आणि पुरावा नसून अटक केली आहे

ट्रांजित रिमांड मध्ये पोलीस चौकशी करतात हे कायद्याला धरून नाही

अधिकचे पुरावे नसताना अटक केली आहे

टायगर श्रॉफवरील हल्ला प्रकारणात अटकेत असलेल्या ४ आरोपींना २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

आरोपींना ४ दिवसांची पोलीस कोठडी

सत्यव्रत जोशी

चौघा आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं

पोलिसांनी 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली होती

मात्र कोर्टाने त्यांना 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

शूटर्सना हत्यार पुरविण्याचा मुख्य आरोप होता

आरोपी क्रमांक चार आणि पाच यांनी दोन्ही तरुणींना हत्यार दिली आणि त्यांनी ती पुढे शूटर्सपर्यंत पोहोचवल्याचा मुख्य आरोप आहे

अजिंक्य मिरगळ, आरोपींचे वकील

तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडमध्ये चौकशी केल्याचं पोलिसांनी सांगितलं

मात्र त्यासंदर्भात चौघा आरोपींविरोधात  कोणाचाही जबाबदार रेकॉर्डवर नाही

चौघांचा कोणताही हेतू नसल्यामुळे कोणताही कट नसल्याचा आमचा युक्तिवाद होता

चौघे घटनास्थळावर हजर देखील नव्हते मग त्यांच्याकडे हस्तगत करण्यासारख काय आहे?

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण

लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य अनिल पंडित याला टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात वॉन्टेड आरोपी घोषित करण्यात आले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टद्वारे अनिल पंडितने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा समोर आला होता.

अटक केलेल्या तीन आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करून पोलिसांनी ९ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.

गोळीबाराचा कट कोणी रचला, त्यामागील उद्देश काय होता आणि शस्त्रे कुठून मिळवली, याचा तपास सुरू.

वापरलेले मोबाईल जप्त करणे, शस्त्रे हस्तगत करणे आणि फरार आरोपींची भूमिका तपासणे हे पोलिसांसमोर आव्हान.

गोळीबारासाठी आर्थिक मदत कोणी केली आणि संघटित गुन्हेगारी टोळीचा सहभाग होता का, याचाही तपास.

आरोपींचे बिहार, हरियाणा आणि इतर राज्यांतील कनेक्शन तपासण्यासाठी पोलिस विविध राज्यांत जाण

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आरोपींच्या आधारकार्डचे फोटो समोर

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपींच्या आधारकार्डचे फोटो समोर आल्याची माहिती आहे.

या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असून, आरोपींची ओळख, त्यांची पार्श्वभूमी आणि गोळीबारामागील नेमका हेतू याचा तपास केला जात आहे

या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या अटक कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

आरोपींच्या आधारकार्डवरील माहिती आणि तपासातील इतर पुराव्यांची पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES