SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मी अजूनही धक्क्यात...', टायगर श्रॉफने जीवघेण्या हल्ल्यानंतर व्यक्त केल्या भावना; पोलिसांना म्हणाला...

18 ऑक्टोबर रोजी अभिनेता टायगर श्रॉफच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारवर किमान पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने टायगर श्रॉफ या घटनेत सुरक्षित बचावला.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 25, 2026, 10:42 AM IST | Updated: Oct 25, 2026, 10:48 AM IST
Image Credit: टायगल श्रॉफने अद्याप नोंदवला नाही जबाब
Join

कारवर गोळ्या झाडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर अभिनेता टायगर श्रॉफला मोठा धक्का बसला आहे. "माझं कोणाशीही शत्रुत्व नाही," असं सांगत त्याने आपल्यावरील हल्ल्याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. या हल्ल्यातून सुदैवाने टायगर श्रॉफ बचावला, मात्र त्याचा चालक आणि एक व्लॉगर जखमी झाले आहेत. 18 ऑक्टोबरच्या संध्याकाळी मुंबईतील जुहू परिसरात दोन व्यक्तींनी त्याच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारवर पाच ते सहा गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते दुचाकीवरून पसार झाले.

या हल्ल्यातून टायगर श्रॉफ अजूनही सावरलेला नाही आणि त्याने आतापर्यंत पोलिसांकडे आपला जबाब नोंदवलेला नाही. त्याच्या घरी जबाब नोंदवण्यासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला त्याने सांगितले, "मी खूप धक्क्यात आहे. मला सध्या काहीही बोलायचे नाही. माझ्यावर जीवघेणा हल्ला कोणी आणि का केला असेल?", असं त्याने विचारलं. "माझं कोणाशीही शत्रुत्व नाही... मग माझ्यावर हल्ला का झाला,?" असा प्रश्न त्याने विचारला. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी टायगर श्रॉफचा चालक फिरदोस बलोच आणि व्लॉगर उमेद चौहान यांचे जबाब नोंदवले आहेत.

टायगर श्रॉफवर हल्ला

टायगर श्रॉफवर रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास, फुटबॉल खेळून परतत असताना त्याच्यावर हल्ला झाला. अभिनेता त्याच्या बीएमडब्ल्यू (BMW) कारमध्ये पुढच्या सीटवर बसला होता. सुदैवाने या हल्ल्यातून तो वाचला आहे. हल्ल्यानंतर समोर आलेल्या अनेक व्हिडिओमध्ये दोन व्यक्ती कारवर गोळीबार करताना दिसत आहेत. गोळीबारानंतर, टायगर श्रॉफ गाडीतून बाहेर पडून स्वतः गाडी चालवत आपल्या जखमी चालकाला रुग्णालयात घेऊन जाताना दिसला.

हे दोन हल्लेखोर ज्यांची ओळख नंतर हरियाणातील फूल सिंग (18) आणि रेहान रहीसुद्दीन अन्सारी (18) अशी पटली. दोघेही तिसरा आरोपी बिहारमधील हृतिक कुमार ऊर्फ रोशन (२२) याच्यासह दुचाकीवरुन तिथून पसार झाले. हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी अंधेरी भागात बेवारस अवस्थेत सापडली आहे.
त्यानंतर आरोपी सुरतला पळून गेले आणि जयपूरला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये बसले. दुसऱ्या दिवशी त्यांना राजस्थानमधील कोटा येथून अटक करण्यात आली. हे तिघे बसने दिल्लीला जाणार होते आणि तिथून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते.

पिस्तूल जॅम झाल्याने वाचला टायगर


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान आरोपींपैकी एकाने वापरलेली तुर्की बनावटीची पिस्तूल जॅम झाली होती. रेहानने वापरलेली 'झिगाना' (Zigana) पिस्तूल हल्ल्याच्या वेळी जॅम झाली आणि त्यातून दोन जिवंत काडतूसं न उडताच बाहेर पडली. सूत्रांनी सांगितले की, हल्ल्याच्या वेळी फूल सिंगने देशी बनावटीच्या पिस्तूलातून गोळ्या झाडल्या होत्या.

सूरतमार्गे दिल्लीला पळून जाण्याची योजना होती, पण चुकली बस

मुंबई गुन्हे शाखेच्या तपासातून समोर आले आहे की, गोळीबार करणाऱ्यांची मूळ योजना सुरतहून बसने दिल्लीला जाण्याची आणि त्यानंतर नेपाळ सीमेपलीकडे निघून जाण्याची होती. मात्र, ते बस स्थानकावर पोहोचले तेव्हा बस निघून गेल्यामुळे त्यांची ही योजना फसली.

बस चुकल्यानंतर, या कटाचा मुख्य सूत्रधार मानला जाणारा अनिल पंडित  याने 'प्लॅन बी' अंमलात आणला. त्याने अटक करण्यात आलेल्या अंकित खटक या दुसऱ्या आरोपीच्या माध्यमातून गोळीबार करणाऱ्यांना नवीन सूचना दिल्या. यानंतर, तिन्ही आरोपी रिक्षाने सुरत रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि पहाटे 1.33 च्या सुमारास पुणे-जयपूर एक्सप्रेसमध्ये चढले. रेल्वे प्रवासादरम्यान पोलिसांकडून तपासणी होऊ शकते, या भीतीने त्यांनी ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी गोळीबारात वापरलेली दोन शस्त्रे आणि दारूगोळा सूरत बस स्थानकाजवळील एका मोकळ्या जागेत लपवून ठेवले होते.

रेल्वेमध्ये चढण्यापूर्वी, त्यांनी गोळीबारात वापरलेली दोन शस्त्रे आणि दारूगोळा सुरत बस स्थानकाजवळील एका मोकळ्या जागेत लपवून ठेवले होते; कारण त्यांना रेल्वे प्रवासादरम्यान पोलिसांकडून तपासणी होण्याची भीती होती. 'प्लॅन बी' (Plan B) अंतर्गत, त्यांना जयपूरच्या बाहेरील मुख्य रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच रेल्वेतून उतरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यांची योजना रेल्वे मार्ग सोडून, ​​बस किंवा टॅक्सीची व्यवस्था करून, रस्तेमार्गे दिल्लीच्या दिशेने जाण्याची आणि त्यानंतर नेपाळची सीमा ओलांडण्याची होती. मात्र, मुंबई गुन्हे शाखेने सुरत बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांच्या हालचालींचा मागोवा घेतला. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES