SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

टायगर श्रॉफनंतर बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्याला धमकी, '5 कोटी दे नाहीतर...'

अभिनेता टायगर श्रॉफवर जीवघेणा हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकार भीतीच्या वातावरणात आहेत. अशातच बॉलिवूडमधील अजून एका अभिनेत्याला बिश्नोई गँग धमकीचा फोन आला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 03, 2026, 11:32 AM IST | Updated: Nov 03, 2026, 11:40 AM IST
Image Credit: Tusshar Kapoor
Join

बॉलिवूड टायगर श्रॉफवर गोळीबार हल्ल्याची अजून ताजी असताना बॉलिवूडमधील अजून एका प्रसिद्ध अभिनेत्याला फोनवरून धमकी देण्यात आली आहे. ही धमकी लॉरेन्स गँगचा सदस्याने दिल्याचे वृत्त समोर आलं आहे. लॉरेन्स गँगचा सदस्य हॅरी बॉक्सर असं त्याचं नाव असून त्याने फोनवरून अभिनेता तुषार कपूरला धमकी दिली आहे. त्याने फोनवरून तुषारला तब्बल  5 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कधी जीवे मारण्याची तर कधी खंडणीसाठी फोन आले आहेत. टायगर श्रॉफवरील गोळीबार हल्ल्यांनंतर बॉलिवूडमध्ये तसंच सध्या भीतीचे वातावरण आहे.

'हॅरी बॉक्सर'ची फोनवरून धमकी!

अभिनेत्याने या प्रकरणाची माहिती मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाची तपासणी आता खंडणीविरोधी पथक आणि गुन्हे शाखा करत आहे. गुन्हे शाखेच्या तांत्रिक पथकाने धमकीच्या फोनमधील ऑडिओ रेकॉर्डिंग तपासला आहे. त्यांच्या डेटाबेसमधील 'हॅरी बॉक्सर'च्या अधिकृत ऑडिओचा नमुना आहे. त्यामुळे तुषार कपूरला आलेल्या ऑडिओचा आवाज हा त्यांच्याकडे असलेल्या ऑडिओशी जुळवण्यात आला आहे. पण यात धक्कादायक खुलासा झाला आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनुसार हे नमुने जुळले नाहीत. त्यामुळे हा फोन बनावट होता की कोणी दुसरी टोळी या नावाचा वापर करून धमकी देत आहे का याचा संशय पोलिसांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात अद्याप कोणतीही एफआयआर दाखल झालेली नाही. तुषार कपूरने सुमारे आठवडाभरापूर्वी ही तक्रार पोलिसांकडे केली होती. 

हेसुद्धा वाचा -  टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, मास्टरमाईंड पंडितच्या घरातून 'त्या' महिलेला अटक

 

टायगर श्रॉफ प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने 13 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी जशी जशी पुढे जातेय या धक्कादायक खुलासे होत आहे. लॉरेन्स गँगला बॉलिवूडमध्ये दहशत पसरवायची आहे, म्हणून टायगरवर हा हल्ला करण्यात आल्याचा खुलासा झाला आहे. लॉरेन्स गँगच्या निशाण्यावर बॉलिवूडमधील सलमान खान, अमिताभ बच्चन, आमिर खान इत्यादी कलाकार आहेत. त्यामुळे अशात तुषार कपूरला खंडणीसाठी फोन आल्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES