• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /कामाची बातमी
  • /Good News! धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, चांदीचे दरही घसरले, वाचा प्रतितोळा सोन्याचे दर

Good News! धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, चांदीचे दरही घसरले, वाचा प्रतितोळा सोन्याचे दर

आज सोन्या-चांदीचे दर पुन्हा घसरले आहेत. आज किती आहेत दर, जाणून घेऊयात.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 03, 2026, 12:22 PM IST|Updated: Nov 03, 2026, 12:23 PM IST
joinshare
Good News! धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, चांदीचे दरही घसरले, वाचा प्रतितोळा सोन्याचे दर
Image Credit: Gold Silver Price Crash

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणेरी मेट्रोचे उद्धाटन, मेट्रो-3 हिंजवडीचं ट्रॅफिक कसं कमी करेल?, तिकिटाचे दर किती? वाचा A TO Z माहिती

पुणेरी मेट्रोचे उद्धाटन, मेट्रो-3 हिंजवडीचं ट्रॅफिक कसं कमी करेल?, तिकिटाचे दर किती? वाचा A TO Z माहिती

2

सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर पडळकारांची पहिली प्रतिक्रिया; खोत म्हणाले ‘अलीबाबाच्या गुहेत वाघाची..’

3

ऐन दिवाळीत लालपरीला ब्रेक! एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपावर जाण्यामागील कारण काय?

4

Good News! धनत्रयोदशीच्या आधी सोनं झालं स्वस्त, चांदीचे दरही घसरले, वाचा प्रतितोळा सोन्याचे दर

5

सांगली - पडळकरांच्या जत सोसायटी गटाच्या मतमोजणीदरम्यान मतपेटीत चिठ्ठी सापडल्याने खळबळ; आत लिहिलं होतं 'लिंगायत...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. सोमवारी सोन्याचे दर वधारले होते. मात्र आज मंगळवारी दोन्ही मौल्यवान धातुच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर व्यवहार सुरू होताच चांदीचे दर 4400 रुपये प्रति किलोने घसरले आहेत. तर. 10 ग्रॅम सोन्याचे दर कोसळले असून 1300 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

चांदीबरोबरच सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. मंगळवारी वायदा बाजार सुरू होताच 4 डिसेंबरच्या वायदा असलेल्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव कोसळून 1,38,800 रुपयांवर पोहोचला. तर, मागील काही दिवसांपूर्वी 1,40,186 वर सोनं व्यवहार करत होते. एका झटक्यात  सोनं 1386 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे.

एमसीएक्सवर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी चांदी 4600 रुपयांनी उसळून 1.83 रुपयांवर पोहोचली होती. मात्र मंगळवारी पुन्हा एकदा चांदी 1.80 लाख रुपयांवर स्थिरावली आहे. सुरुवातीच्या व्यवहारात चांदी 1.79.350 रुपयांवर ट्रेड करतेय.

चांदीच्या दरात अलीकडे झालेल्या घसरणीमुळे, ती तिच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षाही स्वस्त झाली आहे. वास्तविक पाहता, 29 जानेवारी 2026 रोजी चांदीच्या किमतीने सर्व विक्रम मोडत, प्रथमच 4 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडून 4,20,048 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र, आता ती या पातळीपेक्षा 2,40,000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाली आहे.

सोमवारी सोने आणि चांदीच्या वायदे दरात वाढ झाली असली तरी, देशांतर्गत बाजारात हे दोन्ही मौल्यवान धातू सातत्याने स्वस्त होत आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA.Com) वेबसाइटनुसार, 2  नोव्हेंबर रोजी देशांतर्गत बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 30 ऑक्टोबरच्या 1,40,054 रुपयांवरून 2530 रुपयांनी कमी होऊन प्रति 10 ग्रॅम 1,37,524 रुपयांवर आला होता. तसेच, 1 किलो चांदीचा भाव 30 ऑक्टोबरच्या 1,81,344 रुपयांच्या तुलनेत 1372 रुपयांनी कमी होऊन प्रति किलो 1,79,972 रुपयांवर आला होता. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gold Price
india
Silver Price