'तू मला इतकं सगळं बोललास...' अक्षर कुमारला ट्विंकल खन्नाने शोच्या मध्येच खडसावलं! Video Viral
'कॉफी विथ करण' च्या प्रदर्शित झालेल्या भागामध्ये अक्षर कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना चालू शोमध्ये अभिनेत्याला खडसावताना दिसली, नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
'कॉफी विथ करण' च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आणि रवी किशन ही जोडी पाहायला मिळाली आहे. शोचा नवा भाग प्रदर्शित झाल्यानंतर या एपिसोडची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. अक्षर कुमारने या शोमध्ये अनेक रहस्य उघड केली आहेत आणि मनमोकळेपणाने संवाद साधला. अक्षर कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखली जाते, अनेकदा ती सोशल मिडियावर किंवा मुलाखतींमध्ये तिची मते मांडत असते. 'कॉफी विथ करण' च्या प्रदर्शित झालेल्या भागामध्ये अक्षर कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना चालू शोमध्ये अभिनेत्याला खडसावताना दिसली, नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
'कॉफी विथ करण'मध्ये एक असा सेगमेंट आहे जिथे सेलिब्रिटींना दुसऱ्या सेलिब्रिटीला फोन करायचा असतो. याच दरम्यान, अक्षय त्याची पत्नी ट्विंकल खन्नाला फोन करतो. ट्विंकलने फोन उचलल्याबरोबर अक्षय तिला विचारतो की ती कुठे आहे, त्यावर ती उत्तर देते, "मी घरी आहे." मग ट्विंकल अक्षयला रागावते, कारण तिला नीट झोप लागली नव्हती आणि ती थकली होती. ट्विंकल सांगते की अक्षयच्या सकाळच्या भजनांमुळे तिच्या झोपेत कसा व्यत्यय आला. पुढे ती म्हणाली की, तू मला इतक्या लवकर उठवलंस. सकाळी सहा वाजता कोण भजनं लावतं? आणि त्यातही, तू इतक्या मोठ्याने गातोस जणू काही अनुप जलोटाच आहेस. बाथरूमचा दरवाजा नीट बंद कर असं मी तुला किती वेळा सांगितलंय?
जेव्हा ट्विंकलला कळले की अक्षय कोणत्याही मानधनाशिवाय शोमध्ये आला आहे, तेव्हा तिने आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाली, "तुम्ही आज शो करत आहात हे मला माहीतच नव्हतं. तुम्ही हे सगळं विनामूल्य करत आहात. मी थक्क झाले आहे." त्यावर करण जोहरने गंमतीने उत्तर दिले, "ट्विंकलला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे हवे असतात का?" या संभाषणामुळे शो अधिकच मजेदार झाला. या एपिसोडमध्ये अक्षय कुमार आणि रवी किशन यांच्यातील एक मजेदार संवादही आहे. रवी किशन अक्षयला त्याची व्हायरल झालेली हुक स्टेप शिकवतो, ज्यात त्याच्या सिग्नेचर स्वॅग वॉकचाही समावेश आहे. दोघेही खूप हसतात आणि विनोद करतात.
ट्विंकल अक्षयला म्हणते, "पण तू तो शो फुकट करायला गेला असशील, नाही का?" हे सर्व स्पीकरवर ऐकणारा करण म्हणतो, "म्हणजे आता तुला वाटतंय की मी तुझ्या नवऱ्याला पैसे द्यावेत." तो असेही म्हणतो की त्यांचे सर्व संभाषण प्रसारित झाले आहे आणि तो ते कापणार नाही. हे ऐकून ट्विंकल हसायला लागते आणि मग अक्षयसुद्धा हसतो आणि फोन ठेवून देतो.